Ticker

6/recent/ticker-posts

अखेर रस्त्यावरील घरकुलाच्या बांधकामास स्थगिती

अखेर रस्त्यावरील घरकुलाच्या  बांधकामास स्थगिती


ये-जा करण्याच्या सरकारी रस्त्यामध्ये अतिक्रमण करून घरकुलाचे सुरू असलेले बांधकामाला स्थगिती मिळाली.
  

 बार्शीटाकळी तहसील के अंतर्गत विझोरा गावांमधील ये-जा करण्याच्या रस्त्यावर घरकुलाचे बांधकाम केल्याने ग्रामसेवकाने वारंवार नोटीस देऊनही रस्ता बळकावला,त्यामुळे विझोरा येथील रहिवासी धम्मनंद दर्गाजी इंगुळे यांच्या शेजारी सचिन अशोक इंगळे व मोहन जगदेव इंगळे यांच्या घरकुलाचे बांधकाम सुरु आहे.धम्मनंद दर्गाजी इंगुळे यांच्या ये-जा करणाऱ्या सरकारी रस्त्यावरच अतिक्रमण करून घरकुलाचे हे बांधकाम सुरु केलेले आहे. यामुळे इंगळे परीवाराचा जाण्याचाच रस्ता बंद झाला आहे. त्यासाठी बुधवार पासुन जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषणासास बसले आहेत. 


सदरचा रस्ता हा ग्राम पंचायत रजिस्टर मध्ये 21 नंबरचा रस्ता म्हणून नोंद आहे. सदर रस्त्याचे नाव संतोष देवमन ईंगळे ते दयाराम बसता उपरास असे असून त्याची लांबी 120 मीटर रुंदी 4 मीटर आहे. हा रस्ता कच्चा आहे. याप्रमाणे सदर रस्त्याची नोंद ग्राम पंचायत रेकॉर्ड ला आहे. या बाबत धम्मानंद इंगळे यांनी वारंवार ग्रामसेवक, बिडीओ ह्यांना तक्रार केली पणं त्याविरोधात कारवाई झाली नाही. 
म्हणून उपोषणकर्ते धम्मनंद दर्गाजी इंगळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली. व अखेर जिल्हा परिषद सदस्य पुष्पाताई इंगळे यांच्या आश्‍वासनानंतर उपोषणकर्त्यांना ज्यूस पाजून उपोषण सोडवले. व रस्ता खुला करून देण्याचे आश्वासन देऊन घरकुल बांधकामावर सरपंच सचिव यांच्या लेखी आदेशाने तूर्तास बांधकामाला स्थगिती दिली व धम्मानंद इंगळे यांना आदेश देण्यात आले व उपोषणाची सांगता करण्यात आली.

Byet:- ग्रामसचिव




अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या