शीमा नाटीकेचा रौप्य महोत्सवाचे सादरीकरण आज अकोल्यात
बुद्धिस्ट लिटरेचर आर्ट साॅग आणि थिएटर अंतर्गत अकोला ऑफिसर फोरम व सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून अकोल्यामध्ये प्रथमच सादर करीत आहेत महाराष्ट्र शासनाच्या सर्वोत्कृष्ट चार पुरस्काराने सन्मानित कलाकृती "शीमा" चा रौप्य महोत्सवी प्रयोग, पारमिता फाउंडेशन निर्मित शीमा ही दोन अंकी नाटिका आहे. यामध्ये प्रमुख कलाकार आमच्या भूमिकेमध्ये ९ कलाकारांचा समावेश असून एकूण १५ कलाकार नाटक सादर करणार आहेत. स्त्रियांच्या अत्यंत नाजूक विषयावर असलेली नाटिका म्हणजेच शीमा, आज अकोल्यात प्रमिलाताई ओक हॉल मध्ये या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. अकोल्यात प्रथमच २५ रौप्य महोत्सवाचे सादरीकरण होत आहे. महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट चार पुरस्काराने सन्मानित कलाकृतीशी शीमा नाटिका, स्त्रियांच्या अत्यंत नाजूक विषयावर असलेले ही नाटिका म्हणजेच शीमा होय. प्रत्येक स्त्री-पुरुषाने ही नाटिका बघावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रधान सचिव आयएएस तमिळनाडू मा. विश्वनाथ शेगोकार , उद्घाटन पोलीस अधीक्षक अकोला मा. श्रीधर, अकोला जिल्हााधिकारी मा. नीमा अरोरा, प्रा. संजय खडसे, निलेश अपार, कविता द्विवेदी, प्रतिभाताई भोजने, संतोष हुशे, सुचिता पाटेकर, डाॅ. प्रसन्नजीत गवईयांची यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे.
स्त्रियांवर होणारे अत्याचार, छेडछाड, बलात्कार, हुंडाबळी या सारखे प्रकरणे या समाजात घडू नये, याला आळा घालण्यासाठी एक प्रयत्न म्हणजे शीमा ही नाटिका होय. या नाटीकेचे लेखक राहुल सिद्धार्थ सावळे व वैभव पांडुरंग सातपुते यांच्या लेखनातुन तयार झालेली नाटीका शीमा होय. सर्व समाजातील प्रत्येक पती-पत्नीने आवर्जून ही नाटिका पाहावी, अशी हो शीमा नाटिका आहे. ही नाटिका आज रविवारी सायंकाळी ०६.०० वाजता प्रमिलाताई ओक हॉल मध्ये होणार असून, ही नाटिका सर्वांना मोफत आहे. अशी माहिती आयोजित पत्रकार परिषद मध्ये डॉक्टर धम्मपाल भदे, विजय कांबळे, सुकेशिनी ताई जमदाडे यांनी दिली. यावेळी जिल्हा रुग्ण कल्याण समिती सदस्य रुग्णसेवक पराग गवई, संकेत शिरसाट, मंगेश गवळी, सतीश वानखडे, एड. आकाश भगत यादी शासकीय विश्रामगृह मध्ये आयोजित पत्रकार परिषद मध्ये उपस्थित होते.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या