मोर्णा नदीच्या तिरावर युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
अकोला जुने शहर पोलीस स्टेशन हद्दी मधील गीता नगर परिसर जवळ मोर्णा नदीच्या काठावर, जेतवन नगर खदान पोलिस स्टेशन परिसरातील अनिल गोडाने वय 26 या युवकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकस आली. आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते लहू रोडे यांनी जुने शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांना प्रथम मीहिती दिली.
जुने शहर पोलीस स्टेशन हद्दी मधील मोर्णा नदी काठच्या भिंतीवर निंबाच्या झाडाला आनंद अनिल गोडाने राहणार खदान जेतवन नगर हा युवक बडनेरा येथे लोहारी काम करतो. तो तीन दिवसापूर्वी अकोला येथे घरी आला होता. सदर युवक काही कामा निमित्त घरून तीन दिवसापूर्वी निघून गेल्याचे नातलगांनी सांगितले. याबाबत बेपता खबर नोंद पोलिस स्टेशनला दिल्याचेही नातेवाईक यांनी कळवीले होते. युवकाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज शनिवारी सकाळी उघडकीस आले. सदर युवकाने पांढरा रंगाचा शर्ट व डार्क निळा जीन्स घातला होता. सदर युवकाची ओळख नातेवाइकांना पटली असून घटनेचा पंचनामा हेड कॉन्स्टेबल अवधूत कांबळे ,पोलीस शिपाई पियुष शेगोकार, अथर्व खान, शेख सादिक पोलीस करीत आहेत. पुढील तपास जुने शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचारी करीत आहेत.
0 टिप्पण्या