Ticker

6/recent/ticker-posts

शुभेच्छा आशीर्वाद कायम ठेवा; आरोग्य सेवा सोबत विकास कार्याला गती देणार : आ.आमदार शर्मा आमदार सावरकर

शुभेच्छा आशीर्वाद कायम ठेवा;  आरोग्य सेवा सोबत विकास कार्याला गती देणार : आ.आमदार शर्मा आमदार सावरकर


अकोला मेडिकल कॉलेज सोनोग्राफी तसेच डायलेसिस मशीन लोकार्पण  

अकोला : आजवर जनतेला विकासाबाबत जनतेला जो शब्द दिला तो पूर्ण करण्याचा लोकनेते खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनात प्रामाणिकपणे पूर्ण केला. या प्रक्रियेतुन जनतेच्या शुभेच्छातून नवी ऊर्जा मिळत गेली . भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम ठेवा , आम्ही अकोला पंचक्रोशीतील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा सोबत मूलभूत सुविधा सोबत सुखदुःखात सहभागी होण्याची परंपरा कायम ठेवून  विकास शील अकोला निर्माण करू, असा विश्वास  आमदार रणधीर सावरकर     यांनी व्यक्त केला. 


अकोला जिल्हा मेडिकल कॉलेज जिल्हा रुग्णालयात लोकनेते माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या सीआर एस फंड  च्या माध्यमातून सोनोग्राफी तसेच स्टेप मशीन तसेच सेवेत तत्पर नेतृत्व आमदार रणधीर सावरकर यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत 4 सोनोग्राफी मशीन चे लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते 
 कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा आमदार गोवर्धन शर्मा हे होते तर मंचावर महापौर अर्चनाताई मसने, अनुप धोत्रे डॉक्टर मीनाक्षी गजभिये, राजेंद्र गिरी, तेजराव थोरात किशोर पाटील वसंत बाछु का, डॉक्टर किशोर मालोकार, डॉक्टर अमित कावरे माधव मानकर योगिता पावसाळे गणेश पावसाळे, अक्षय गंगाखेडकर, डॉक्टर गुरु  दासानी डॉक्टर मुकुंद अष्टपुत्रे, डॉक्टर अभय जैन एडवोकेट देवाशीष काकड, उषा विरक, अजय शर्मा, जानवी डोंगरे सुमन ताई गावंडे, निलेश नीनोरे , संतोष पांडे गणेश अंधारे, संजय गोडा संजय गोडफोडे, जयंत मसने गिरिष जोशी नीलेश ठेवा, विकी ठाकूर मनीष बुंदिले, सतीश ढगे अभिजित बांगर, अक्षय जोशी,  शंकरराव इंगोले, रमेश कहरीयार, मनोज साहू, अभिमन्यू नळकांडे , डॉक्टर वरठे,डॉक्टर रमेश पवार डॉक्टर अरविंद आडे वासुदेव धुळे महेश महाकाली वार अभिजीत खरसे डॉक्टर मंगेश जोशी आदी प्रामुख्याने उपस्थित होते
    खासदार संजय भाऊ धोत्रे यांनी अकोला जिल्ह्यात सोबत बुलढाणा वाशिम हिंगोली अमरावती जिल्ह्यातील नागरिकांना चांगल्या आरोग्य प्राप्त व्हावे यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून 130 कोटी रुपये निधी आणून अकोला सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल निर्माण केला तसेच covid-19  काळामध्ये सतत संपर्क करून केंद्र व राज्य सरकारकडून अत्याधुनिक लॅबोरेटरी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या ऑक्सिजनचा पुरवठा सतत सुरू ठेवून महाराष्ट्राच्या अन्य राज्यांच्या तुलनेत अकोल्यात ऑक्सिजन ची कमतरता भासू दिली नाही तसेच विविध साहित्य वेंटिलेटर उपलब्ध करून दिले तसेच माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सीआरसी फंडातून ऑक्सीजन प्लांट तसेच  जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून मेन हॉस्पिटल  आणि लेडी हार्डिंग ऑक्सिजन प्लांट उभा केला त्यामुळे अकोल्यात च्या हॉस्पिटल मध्ये राज्यातील 12 जिल्ह्यातील नागरिकांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला ही आरोग्य कर्मचारी डॉक्टर यांच्या सेवेचा प्रतिफल असल्याचे आमदार सावरकर यांनी सांगितले तसेच कर्मचाऱ्यांच्या समस्या व जनतेच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अकोला मेन हॉस्पिटल येथे विविध साहित्य उपलब्ध करून देण्यात आले व आपल्या निधीतून तसेच आमदार पिंपळे भाजपा लोकप्रतिनिधींनी आपल्या ठिकाणी आपल्या निधीचा वापर करून गप्पांचा बाजार न करता सामाजिक दायित्व म्हणून व जनतेप्रती असलेली संवेदना च्या माध्यमातून कार्य करू 18 तास रूमवर च्या माध्यमातून श्री रामनवमी शोभायात्रा समिती तसेच भारतीय जनता पक्षाने नमो थाली च्या माध्यमातून जनतेला आधार देण्याचा काम केल्याचे प्रतिपादन आमदार गोवर्धन शर्मा यांनी केले यावेळी अकोला मेडिकल कॉलेज एचडी श्रीमती मीनाक्षी गजभिये यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी संकट च्या काळामध्ये समन्वयाने एकमेकांच्या भावना समजून कार्य केल्या त्यामुळे हे संकट का सामना करू शकलो सतत जनभावना लक्षात घेऊन हॉस्पिटल मधील रुग्णसेवा हे आशीर्वाद सेवा  असल्याचे त्यांनी या प्रसंगी सांगितले 


  खासदार संजय भाऊ धोत्रे यांनी सातत्याने विकासाचा महामंत्र स्वीकार करून जनतेच्या भावना ओळखून कार्य केल्यामुळे जनतेचा विश्वास पाठिंबा सदिच्छा त्यांच्या पाठीशी आहे भारतीय जनता पक्षाचा विस्तारा सोबत समाजातील सर्व नागरिकांना जात पात धर्म सोडून शासकीय योजना सोबत आरोग्य सेवा चांगल्या लाभावा यासाठी सातत्याने आग्रही भूमिका घेण्यात येत असल्यामुळे त्यांच्या पाठबळाने आमदार गोवर्धन शर्मा आमदार रणधीर सावरकर व लोकप्रतिनिधी सातत्याने कार्यरत असल्याचे प्रतिपादन महापौर अर्चनाताई मसने यांनी केले     यावेळी प्रमुख अतिथींचे स्वागत मेडिकल कॉलेज च्या वतीने मीनाक्षीताई गजभिये यांनी व डॉक्टर गुरुदास दासानी  महेश महाकाली वार यांनी केले
 कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर रमेश पवार यांनी केले
    यावेळी आमदार रणधीर सावरकर यांनी विविध सूचना करून जनतेच्या समस्या निराकरणासाठी आरोग्य सेवा ही जनसेवा असल्यामुळे गरिबांना आधार देणाऱ्या कार्य करण्यासाठी डॉक्टर मंडळी व कर्मचाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी विविध समस्या आमदार सावरकर यांनी जाणून घेऊन राज्य शासन व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे अभिवचन यावेळी दिले
    

 भाजपा लोकप्रतिनिधी  जो शब्द देतात, तो ते पाळतात. म्हणूनच जनतेच्या प्रत्येक मागण्या पूर्ण करण्यासाठी संजय भाऊ धोत्रे  मार्गदर्शनात प्रयत्नरत आहे.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या