अकोलेकरांचा अविरत प्रेम विश्वास साथ मिळत असल्याचे प्रतिपादन- आमदार गोवर्धन शर्मा
अकोला
मतदारांना मूलभूत सुविधांची गरज लक्षात घेता सामाजिक कर्तव्य व लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी लक्षात घेऊन सतत तीस वर्षापासून लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचा विश्वास त्यांचा सन्मान, भावना, विकासकामात राजकारणात सातत्याने मतदार संघातील भौगोलिक सामाजिक आर्थिक अध्यात्मिक शैक्षणिक विकासासाठी आपण प्रामाणिकपणे कार्यरत असल्यामुळे अकोले करांचा अविरतपणे प्रेम विश्वास साथ मिळत असल्याचे प्रतिपादन आमदार गोवर्धन शर्मा यांनी केले
आमदार गोवर्धन शर्मा यांच्या स्थनिक विकास निधी अंतर्गत प्रभाग क्र 15 मधिल लक्ष्मी नगर भागवत हॉस्पिटल , बुलढाणा अर्बन बँक जवळील कविता अप्पा , आदर्श कॉलोनी येथील म.न.पा.16 न शाळे मागिल तसेच व्ही.एच.बी कॉलोनी, विदर्भ हाऊसिंग कॉलोनी मधिल खंडेलवाल शाळे मागिल*सहा रस्त्यांचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते , कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी , महापौर सौ अर्चनाताई जयंत मसने, होत्या तर उप -महापौर राजेंद्रजी गिरी , सभापति संजयजी बड़ोणे,सरचिटणीस अक्षय गंगाखेडकर ,दक्षिण मंडळ अध्यक्ष श्री गगेश अंधारे,नगरसेवक श्री बाळ टाले , सौ मनिषा भन्सली,सौ.शारदा खेडकर ,श्री विजय इंगळे, यांच्या प्रमुख म्हणून उपस्थित होते . राजेश रेड्डी , निखिल ठाकुर , हरिश अमानकर,डॉ.भागवत, रमण पाटिल ,मनिष बुंदेले , रणजित खेडकर,राधेश्याम शर्मा, राजेश बैस , पाहुण्यांचे स्वागत केले यावेळी नागरिक मोठ्या संखेने उपस्तित होते.
0 टिप्पण्या