Ticker

6/recent/ticker-posts

असंघटीत मजुरांच्या संघर्षाला अखेर आले यश

असंघटीत मजुरांच्या संघर्षाला अखेर आले  यश


इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळा मार्फत
प्रत्यक्ष काम करणाऱ्या मजुरांना मिळणार मध्यान्ह भोजन

बिल्डींग पेटर्स बांधकाम मजुर असोसिएशन अकोला जिल्हा यांनी केले होते अनेकदा आंदोलने 



अकोला -- इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी  मंडळाच्या नोंदणीकृत सदस्यांना 26 जानेवारी पासूम दररोज  मध्यान्ह भोजन (दुपारचे जेवण) ही योजना सुरु होत असून  याची सुरुवात वीट भट्टा वर काम करणाऱ्या मजुरांपासून होत आहे अकोला जिल्ह्यात बिल्डींग पेटर्स बांधकाम मजुर असोसिएशन अकोला जिल्हा यांनी अनेकदा आंदोलने केले होते   त्यामुळे इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळा मार्फत प्रत्यक्ष काम करणाऱ्या मजुरांना मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात येत आहे त्यासाठी   नोंदणीकृत सदस्यांनी आधारकार्डचे झेरॉक्स व इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचा नोंदणी क्रमांक व मोबाईल नंबर लिहून संघटनेच्या जनसंपर्क कार्यालयात जमा करावे. नोंदणीकृत नसलेल्या असंघटीत कामगारांना देखिल प्रायोगीक तत्वावर या योजनेत सामावून घेतले जात आहे   त्यांनी तात्काळ नोंदणी करावी व कायम मध्यान्ह भोजनाचा आनंद घ्यावा. असे आवाहन बिल्डींग पेटर्स बांधकाम मजुर असोसिएशन अकोला जिल्हाध्यक्ष शैलेश सुर्यवंशी ,सचिव पंचशिल गजघाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे तसेच शासनाने  कष्टकरी कामगारांच्या हितार्थ मध्यान्ह भोजन योजना  लागू केल्या बद्दल मंडळाचे
हार्दीक धन्यवाद! व्यक्त केले आहेत 



मजुरांना घरात आर्थिक तंगी किंवा घरात आजार असल्याने वेळेवर टिफिन तयार होत नाही परिणामी प्रत्यक्ष कामावर मजूर उपाशी पोटी काम करतो त्यामुळे त्याचे आरोग्य धोक्यात येऊन तो मजूर अल्पायुषी ठरतो ही बाब  शासनाच्या निदर्शनात आणून देण्यासाठी बिल्डींग पेटर्स बांधकाम मजुर असोसिएशन अकोला जिल्हाध्यक्ष शैलेश सुर्यवंशीयांचे नेतृत्वाखाली अनुराधाताई उ. ढिसाळे, विशाल दे घायवट, अजिंक्य शै. सुर्यवंशी, अक्षय अ. सुर्यवंशी, अहेमद अली मर्दान अली, विनोद भ. रामटेके, राजेश गोंदेकर, प्रकाश वाडे, मो. रफीक मो. खैरु, राजेश चव्हाण, भास्कर सोनोने, बशिर खान नासिर खान, संतोष उमाळे, जहिर सिध्दीकी तमिज सिध्दीकी, संदीप प्रभाकर नरवणे, अनिल येलकर, राजु शाह, राजु किर्तक, राजु दामोदर, सतीश वाघ, सुनिल तायडे, सुनिल राऊत, सतिश नागदेवे, गजानन राऊत, प्रशांत तिरपुडे, हरीश किर्तक, श्रावण रंगारी, संतोष साळुके, सुधाकर  माने,  यांनी अनेकदा निवेदने देऊन आणि आंदोलने केली होती त्यामुळे शासनाने ही योजना कार्यांवित केली असून असंघटीत मजुरांच्या संघर्षाला अखेर   यश आले असल्याचा आनंद मजूर व्यक्त करीत आहेत


माजी सरपंच मनोहर डोके व ग्राम सेवक विनायक वायाळ,  जऊळका (वरुर) यांचेवर गुन्हे दाखल करा 

आक्रमण युवक संघटनेच्या वतीने आज मुख्य कार्यकारी अधिकारी  जिल्हा परिषद, अकोला यांना इशारा 

अकोला ---गेल्या काही दिवसांपासुन ग्राम पंचायत कार्यालय जऊळका वरुर या गावाचा भ्रष्टाचार नितेश प्रमोद धांडे यांनी उघडकीस आणला व माजी सरपंच मनोहर डोके तसेच  ग्रामसचिव विनायक वायाळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल
करण्यासाठी खूप दिवसांपासुन पाठपुरावा करीत आहेत. दिनांक ३०.१२.२०२१ रोजी न्याय मिळण्यासाठी आत्मदहन आंदोलनही केले पण शासनाला जाग आली नाही. या दोघांनी मिळून भ्रष्टाचार केला हे चौकशीत उघडकीस आले आहे. त्यामुळे  नियमानुसार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत .आणि  कार्यवाहीची लेखी माहिती संघटनेला देण्यात यावी आणि लवकरात लवकर माजी सरपंच व ग्रामसचिव यांच्यावर गुन्हे दाखल करावे अन्यथा आक्रमण युवक  संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आज  मुख्य कार्यकारी अधिकारी  जिल्हा परिषद, अकोला.यांना निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी आक्रमण युवक  संघटने चे अध्यक्ष सुरज मेश्राम,महासचिव राजेश भीमकर,संदीप सवाई, उपसरपंच दीपक शेटे ,तालुकाध्यक्ष नितेश धांडे  राहुल इंगोले,शुभम घनबहाद्दूर  सुजित दांदळे,सुभाष अंभोरे,प्रकाश घनबहाद्दूर, वसंतराव शेटे  आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या