परिवार व संस्कारातून कार्यरत वसंत खंडेलवाल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकप्रतिनिधींच्या सन्मान व गौरव
अकोला
परिवार व संस्कारातून कार्यरत वसंत खंडेलवाल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकप्रतिनिधींच्या सन्मान व गौरव सोबत विकासाच्या दृष्टीने सर्वांना सोबत घेऊन अकोला बुलढाणा वाशीम जिल्ह्यात भाजपाचे विचार सोबत त्यांच्या समस्या निराकरण यासाठी यशस्वी होतील असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री खासदार संजय भाऊ धोत्रे यांनी व्यक्त केला.
आज धोत्रे निवासस्थानावर नवनिर्वाचित आमदार वसंत खंडेलवाल व पुष्पाताई खंडेलवाल भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी भेट घेऊन खासदार धोत्रे यांचा आशीर्वाद घेतले. समाजसेवा राजकारणातले यशस्वी होण्याचे धडे घेतले. यावेळी खासदार धोत्रे यांनी भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांचे सुद्धा कौतुक केले. सर्व पदाधिकारी कार्यकर्ता व मतदारांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी झाल्याबद्दल त्यांनी सर्व मतदारांचे आभार व्यक्त केले.
यावेळी सौभाग्यवती सुहासिनी ताई धोत्रे यांनी आमदार खंडेलवाल व पुष्पाताई खंडेलवाल यांचे स्वागत केले. यावेळी अनुप धोत्रे, समीक्षा धोत्रे यांनी सुद्धा स्वागत केले,. यावेळी आमदार खंडेलवाल प्रदेश तसेच तिन्ही जिल्ह्यातील नेते सर्व पक्षातील मतदार व हितचिंतकांचे सहकार्य हेच विजयाची शिदोरी असून त्यांचा विश्वास प्रेम स्वाभिमान कायम ठेवून कार्यरत राहू अशी ग्वाही दिली
0 टिप्पण्या