Ticker

6/recent/ticker-posts

९० टक्के पेक्षा जास्त लसीकरणः ग्रामपंचायतींना प्रोत्साहनपर विशेष पुरस्कार; ३१ डिसेंबर पर्यंत मुदत

९० टक्के पेक्षा जास्त लसीकरणः ग्रामपंचायतींना प्रोत्साहनपर विशेष पुरस्कार; ३१ डिसेंबर पर्यंत मुदत



 अकोला,दि.१८(जिमाका)- कोविड-१९ च्या विषाणुला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण प्रभावी माध्यम आहे. नागरीकांनी लसीकरण करावे याकरीता प्रशासनाव्दारे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. ग्रामिणस्तरावर लसीकरणाला गती देण्यासाठी जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाव्दारे ग्रामपंचायतींसाठी प्रोत्साहनपर योजना राबविली जात आहे. त्यानुसार  शुक्रवार दि. ३१ डिसेंबरपर्यंत गावाच्या उद्दिष्टाच्या ९० टक्के पेक्षा जास्त लसीकरण करुन घेणाऱ्या ग्रामपंचायतीना विशेष पुरस्काराने सन्मानीत करण्यात येईल,असे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी कळविले आहे.


ग्रामपंचायतस्तराव कोविड लसीकरणासाठी  प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना राबविली जात आहे. त्यासाठी रविवार दि. १० डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. ती आता ३१ डिसेंबर पर्यंत वाढविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी निमा अरोरा व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी घेतला आहे. या अंतर्गत  ९० टक्के पेक्षा जास्त लसीकरण करणाऱ्या ग्रामपंचायतीना  तालुकास्तरावर लकी ड्रॉ पद्धतीने प्रत्येक तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीना विशेष पुरस्कार देण्यात येतील. तसेच जिल्ह्यातील सर्व ग्रामपचायंतीमधुन लकी ड्रॉ पद्धतीने तीन ग्रामपंचायतीना जिल्हास्तरावरुन विशेष पुरस्कार देण्यात येतील. ९० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण करणाऱ्या सर्व  ग्रामपंचायतींना सन्मानपत्र देण्यात येईल.
 स्पर्धेत विजेता ग्रामपंचायतीना सर्व पुरस्कार जिल्हा परीषद व जिल्हा प्रशासनाकडुन देण्यात येतील. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींनी आपल्या भागातील नागरीकांनी पहिला डोस पुर्ण करणे व देय असलेल्या दुसऱ्या डोसबाबत नागरीकांना प्रेरीत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्या. तसेच आपल्या गावातील नागरीकांनी जास्तीत जास्त लसीकरण करुन या मोहिमेमध्ये सहभाग घेण्याबाबत आवाहन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा व जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या