भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त देशाच्या इतिहासात आदिवासी संस्कृती संवर्धन
अकोला
आदिवासी जनजाति समाजाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार कटिबद्ध असून 15 नोव्हेंबर आदिवासी दिवस साजरा साजरा करण्याचा इतिहासिक निर्णय घेऊन भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त देशाच्या इतिहासात आदिवासी संस्कृती संवर्धन आता संग्रहालय तसेच भोपाळ येथे आदिवासी समाजाच्या कार्यक्रमात सहभाग घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास त्यादृष्टीने वाटचाल करून भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त दिशादर्शक कार्य केल्याचे प्रतिपादन जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
भाजपा कार्यालयात भाजपा अनुसूचित जाती जमाती आघाडीच्या वतीने आयोजित भगवान बिरसा जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आघाडीचे अध्यक्ष उमेश पवार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून कार्यकारी सदस्य तेजराव थोरात, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल माधव मानकर, विनायक सुतवणे, विजय हलदे, राजेश रावणकर रायसिंग राठोड अमर सिंह भोसलेआदी प्रामुख्याने उपस्थित होते
यावेळी तेजराव थोरात यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. देश स्वातंत्र काळाच्या संग्रामात आदिवासी समाजाची महत्त्वपूर्ण भूमिका असून काँग्रेसने इतिहास चुकीचा कम्युनिस्ट पक्षांच्या माध्यमातून लिहून समाजामध्ये चुकीची माहिती प्रस्तुत केली देशातील खरे स्वातंत्र्य सैनिक व त्यांचा त्याग बलिदान समाजाला माहिती व्हावी व सर्वांचा सहभाग या आंदोलनात होता यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार केवळ विशिष्ट करण्याचा फायदा करण्यासाठी खोटे आडनाव धारण करून, जनतेचा विश्वासघात केला परंतु जनता सुजाण झाली आहे असेही यावेळी उमेश पवार यांनी सांगून भाजपा नेतृत्वा खालील सरकार केलेल्या काम कामकाजाची माहिती दिली व आदिवासी समाज भाजपाच्या पाठीशी उभा करू असेही यावेळी सांगितले अकोला जिल्ह्यात खासदार संजय धोत्रे आमदार रणधीर सावरकर व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आदिवासी संमेलन अकोट तालुक्यात गेल्या पाच वर्षापासून होत आहे हे त्याची प्रचिती असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन रामा दबेराव प्रास्ताविक अमरसिंह भोसले तर तर आभार प्रदर्शन राजीव गोंदेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभिमन्यू नळकांडे, मोहन गेडाम, बाबू सिंग राठोड राजेश डाबेराव विशाल भारसाकडे राजू सिंग राठोड, दादाराव भास्कर संजय चव्हाण राजेश डाबेराव अमोल खांदे सुभाष डाबेराव जितेश अहिर देवा भारसाकळे मनोज वनचरे विशाल भारसाकळे मनीषा बामनकर मनीष बामनकर बाळकृष्ण भरगुडे धनश्री सोने बाळकृष्ण भरकडे लक्ष्मण डाबेराव राजू सोळंके पवन डाबेराव ऋषभ सोनवणे करण मालवे अभी चव्हाण विनायक सोळंके मंगला सोनवणे आदी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकार यांचे अभिनंदन आभार व्यक्त करण्यात आली.
0 टिप्पण्या