Ticker

6/recent/ticker-posts

नवदुर्गा विसर्जन व धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे अनुशंगाने अकोट-अकोला वाहतुक पर्यायी मार्गाने

*नवदुर्गा विसर्जन व धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे अनुशंगाने अकोट-अकोला वाहतुक पर्यायी मार्गाने*

अकोला
अकोला शहर व परिसरातील नवदुर्गा मुर्तीचे विसर्जन गांधीग्राम येथील पुर्णा नदीचे पुलावर दिनांक १६/१०/२०२१ रोजी होत आहे. तसचे याच दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा होणार आहे. नवदुर्गा विसर्जन व धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे अनुशंगाने बंदोबस्त दरम्यान वाहतुकीचा अडथळा होवू नये व रहदारी नियंत्रणाचे दृष्टीने अकोट अकोला तसेच अकोला-दर्यापूर राज्य मार्गावरील वाहतुक मा. पोलीस अधिक्षक साहेब अकोला त्यांचे आदेशान्वये दिनांक १६/१०/२०२१ चे सकाळी ०६.०० वाजता पासून ते दिनांक १७/१०/२०२१ चे सकाळी ०६.०० वाजे पर्यंत पर्यायी मार्गाने वळविण्यात आलेली आहे. तरी सर्व वाहन चालक / मालक यांनी वर नमुद तारखेस पर्यायी मार्गाचा अवलंब करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.


1) मार्ग:- अकोला-अकोट जाणारी व येणारी वाहतुक पर्यायी मार्ग :- एस. टी स्टँड अकोला - भगतसिंग चैक वाशीम बायपास - शेगांव टी पॉईंट- गायगांव - निंबा फाटा - देवरी - अकोट. तसेच अकोट - अकोला येणारी वाहतुक याच मार्गान वळविण्यात येईल.

2) मार्ग :- अकोला-दर्यापुर जाणारी व येणारी वाहतुक पर्यायी मार्ग :- दर्यापूर- खरप टी पाँईट- न्यु तापडीया नगर - जठारपेठ चैक - दुर्गा चैक - नेहरू पार्क चैक-अशोक वाटीका एस.टी. स्टँड अकोला तसेच अकोला ते दर्यापुर कडे जाणारी वाहतुक याच मार्गाने वळविण्यात येईल.

3) शहरातील अंतर्गत मार्गावरील वाहतुक. अ) मार्ग:- रेल्वे स्टेशन चौक ते रेल्वेब्रीज- अकोट स्टँड ते बियाणी चौक- कोतवाली चौक- गांधी चौक - धिंग्रा चौक पर्यायी मार्ग :- रेल्वे स्टेशन चौक- अग्रसेन चौक - दुर्गा चौक - रतनलाल प्लॉट चौक - सिव्हील लाईन चौक- नेहरू पार्क चौक कडे

४) मार्ग:- अशोक वाटीका चौक - धिंग्रा चौक- टॉवर चौक रेल्वे स्टेशन चौक.

@पर्यायी मार्ग :- अशोक वाटीका - नेहरू पार्क चौक- सिव्हील लाईन चौक - रतनलाल प्लॉट चौक- दुर्गा चौक - भांबुरकर हाॅस्पीटल चौक - रेल्वे स्टेशन चौक.



*पोलीस निरीक्षक विलास पाटील यांचे परिपत्रक, अकोला*

अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या