स्व.कन्नुभाई मश्रुवाला स्मृतीप्रित्यर्थ सर्वोदय चरखा प्रशिक्षण व संशोधन केंद्र - सर्वोदय मंळाचा उपक्रम
अकोला --
चरखा संस्कृती संवर्धन,वस्त्रस्वावलंबनासाठी ज्येष्ठ गांधीवादी स्व.कन्नुभाई मश्रुवाला स्मृतीप्रित्यर्थ चरखा प्रशिक्षण व संशोधन केंद्र अकोला येथे कार्यान्वीत होत असल्याची माहिती अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष बबनराव कानकिरड यांनी दिली.
जिल्हा सर्वोदय मंडळाच्या बैठकित बोलत होते.
ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते स्व. कन्नूभाई मश्रुवाला यांनी गांधीविचार प्रचार प्रसारासाठी अवघे आयुष्य समर्पित केले.त्यांचे स्मृतीप्रित्यर्थ अकोल्यात चरखा शिक्षण व संशोधनासाठी अध्ययन केंद्र कार्यान्वीत होत आहे.त्यासाठी ज्येष्ठ सर्वोदयी महादेवराव भुईभार,भाऊसाहेब पोटे, ह.बा.खंडारे यांच्या मार्गदर्शनात समन्वय समिती गठित करण्यात आली आहे. प्रशिक्षण समितीत वसंतराव केदार,श्रीकृष्ण वाघमारे,प्रल्हादराव नेमाडे,आत्माराम शेळके, भाऊराव गावंडे,रामचंद्र राऊत,संशोधन समितीत डाॅ. काशीनाथ दाते,प्रा.डाॅ.किरण वाघमारे,डाॅ.जयकृष्ण वाकोडे ,केशवराव कोठाळे व प्रा.बबनराव कानकिरड यांचा समावेश आहे.व्यवस्थापन समितीत डाॅ.मिलींद निवाणे अंबादास वसु,नितीन भरणे,किशोरकुमार मिश्रा,आकाश इंगळे ,रोहित तारकस,डाॅ.गवई यांचा समावेश असलेली समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे.लवकरच अकोला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे केंद्र कार्यान्वीत होत आहे.चरखा प्रशिक्षण ,रोजगार व संशोधनात आवड असणार्यांनी 8830028911 या भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचे आवाहन सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड यांनी केले आहे.
सभेचे संचालन डाॅ.मिलींद निवाणे यांनी केले.आभारप्रदर्शन आकाश इंगळे यांनी केले.सर्वधर्म प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.
0 टिप्पण्या