चोहोट्टा बाजार येथील ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून धूळ खात
मुख्य ठिकाण असतानाही या ठिकाणी पाहिजे ती आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाही, प्रस्तावाला मंजुरी मिळण्याकरिता , अकोल्यातील, शेतकरी नेते पुर्णाजी खोडके यांनी घेतली मंत्रालयात धाव
मुंबई: महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार येथे,ग्रामीण भागातील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या चोहोट्टा बाजार येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्याची मागणी गत अनेक दिवसांपासून होत आहे. अकोल्याच्या आरोग्य विभागाने तसा प्रस्तावसुद्धा तयार केला आहे; परंतु हा प्रस्ताव अनेक दिवसांपासून धूळ खात पडून असल्याचे दिसून येत आहे.अकोट-अकोला या मुख्य मार्गाच्या अगदी मध्यभागी चोहोट्टा बाजार हे मुख्य गाव आहे. या गावाला लागूनच ५२ गो जोडलेली आहेत. चोहोट्टा हे गाव अगदी सोयीस्कर पडत असल्याने या ठिकाणी येऊन परिसरातील नागरिक आपले दैनंदिन व्यवहार करतात; परंतु मुख्य ठिकाण असतानाही या ठिकाणी पाहिजे ती आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाही. एक उपकेंद्र आहे; परंतु परिसरातील गावांचा विचार करता या उपकेंद्राच्या आरोग्य सुविधा पुरू शकत नाहीत. कावसा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रआहे. ते दूर पडत असल्याने रुग्णांना त्या ठिकाणी जाणे अडचणीचे ठरते. ग्रामीण भागातील जनतेला अतिशय सोयीस्कर ठरणाऱ्या चोहोट्टा बाजार येथे ग्रामीण रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र,मंजूर व्हावे, अशी मागणी खोडके व नागरिक अनेक दिवसांपासून करत आहेत....
यासंदर्भात खोडके अनेक दिवसापासून मागणी करत असून, आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने असा ठराव सुद्धा पाठवलेला आहे. मंजूर करून हा ठराव शासनाकडे प्रलंबित असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. यावर खोडके यांनी दिनांक, 15,16, एप्रिल 2025 रोजी मुंबई मंत्रालय येथे धाव घेऊन. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना प्रत्यक्ष भेटले.. तर मुख्यमंत्री सचिव यांना सुद्धा भेटले. व मुख्यमंत्री यांना निवेदन दिले.. व प्रस्ताव आपल्याकडे शासनाकडे प्रलंबित असून तात्काळ त्याला मंजुरी देण्यात यावी.. अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली... उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, या संदर्भात नक्कीच त्याला मंजुरी देणार. असल्याचे खोडके यांना सांगितले.. तसेच यावेळी मुख्यमंत्री सचिव यांनी यासंदर्भात सदरील प्रश्न हा लोकहिताचा असून.. सार्वजनिक असून. प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन यावेळेस खोडके यांना दिले..
कोडं....
मंत्रालय मुंबई येथे उपमुख्यमंत्री,व सचिव यांचेशी मिळावे, म्हणून चर्चा...
चोहोट्टा बाजार येथे ग्रामीण रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे याकरिता मी बरेच दिवसापासून मी व नागरिक प्रयत्न करत आहेत. या ठिकाणी आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालय पाहिजे ,जिल्हा प्रशासनाने मंजूर देऊन वरिष्ठांकडे आरोग्य उपसंचालकांकडे सदली प्रस्ताव पाठवलेला होता .परंतु हा वर्षापासून प्रलंबित आहे.. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत प्रत्यक्षात तर मुख्यमंत्री सचिव यांच्यासोबत प्रत्यक्षात यासंदर्भात , चर्चा केली निवेदन दिले..... प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.. या ठिकाणी घ्यावी या साठी जो पर्यंत मिळाणर नाही तो पर्यंत प्रयत्न पाठपुरावा सुरूच राहणार....
पूर्णाजी खोडके
प्रदेशाध्यक्ष विदर्भ युवा अध्यक्ष रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य
कोडं...
मंत्रालयात धाव घेणारे खोडके कोण आहेत...
अकोला जिल्ह्यातील चोहोट्टा बाजार परिसरातील, गोरगरीब शेतकरी कुटुंबातील असलेले, वय फक्त 21 वर्ष, असलेले, दैनिक दिव्य मराठीचे पत्रकार तथा रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष गेल्या चार वर्षापासून शेतकरी विद्यार्थी निराधार बंधू गोरगरिबांसाठी झटणारे. निस्वार्थपणे सेवा करणारे, पूर्णाजी खोडके हे, मूर्ती लहान पण किर्ती महान, त्यांच्या विविध लोकहिताच्या सामान्य नागरिकांच्या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांच्या शेतकरी बांधवांच्या व विविध प्रश्नाने नेहमी महाराष्ट्र भरात चर्चेत असतात...
0 टिप्पण्या