Ticker

6/recent/ticker-posts

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण पुरस्काराने सन्मानित ! पुरस्कार घेण्याकरिता राहिले नव्हते जगात

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण पुरस्काराने सन्मानित ! पुरस्कार घेण्याकरिता राहिले नव्हते जगात



महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे पुरस्काराचे आयोजन 
 

प्रतिनिधी- संतोष माने 
नवी दिल्ली:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण या राष्ट्रीय पुरस्काराचे आयोजन संविधान दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती नवीन महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे आज यांना सभागृहात पार पडले, यावेळी महाराष्ट्र,गोवा, बिहार, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर,उडीसा, उत्तर प्रदेश, व दक्षिण भारतातील विविध क्षेत्रातील व महाराष्ट्रातील अमरावती, नागपूर, यवतमाळ,वर्धा, अकोला बुलढाणा, ठाणे, मुंबई, पालघर, पुणे, औरंगाबाद चंद्रपूर, सोलापूर व आदी जिल्ह्यांतील सरपंच ग्रामसेवक, पत्रकार,सामाजिक शैक्षणिक, कला, साहित्य सांस्कृतिक उल्लेखनीय काम केलेल्या तसेच सरपंच पदावरून ग्रामविकासात भरीव कार्य केले सरपंच पत्रकारितेतून परिवर्तन चे काम केलेले अरुण तुकाराम जी वानखडे राहणार पोही तालुका मूर्तिजापुर जिल्हा अकोला यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . मात्र हा पुरस्कार घेण्याकरिता त्यांचा दिनांक 19 डिसेंबर रोजी मृत्यू झाला. व हा पुरस्कार तीन जानेवारी रोजी मान्यवरांनी त्यांच्या राहत्या घरी पोही येथे येऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या घरच्या नातेवाईकांना हा पुरस्कार प्रदान केला .यावेळी माजी केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी अल्पसंख्याक सदस्य रेंचलना यांच्या हस्ते 


अरूणराव तुकारामजी वानखडे हे पोही येथील रहिवासी असून जिल्ह्यातील अकोला ता.मुर्तीजापूर यानां सन्मान पत्र प्रशस्तीपत्र मेडल प्रदान करण्यात आले .यावेळी मंचावर दक्षिण भारतातील सिनेट अभिनेत्री नुसरत जहाँ प्रेरणा शर्मा भाटिया डॉक्टर मनीष गवई, किशोर मकवान ठाकूर चंदनसिंग राष्ट्रीय अध्यक्ष प्रधान मुख्य सरपंच राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल उके मंचावर उपस्थित होते. या नेतृत्व दीपक सोहळ्यास मीनाक्षी प्रेरणा शर्मा गुलशन खत्री यांनी समायोजित भाषणे झाली. अरुण तुकाराम जी वानखडे यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल माजी केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी व अल्पसंख्यांक आयोग सदस्या रिंचलना यांच्या हस्ते सन्मानपत्र व मेडल देऊन त्यांचा मरणोत्तर गौरव करण्यात आला.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या