Ticker

6/recent/ticker-posts

ई.व्ही.एम हटवून मतांचे दान बॅलेट पेपरवर घ्या - राष्ट्रशक्ती हमचालिस संघटना

ई.व्ही.एम हटवून मतांचे दान बॅलेट पेपरवर घ्या - राष्ट्रशक्ती हमचालिस संघटना



उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना पाचशेच्या मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र


 प्रतिनिधी नागोराव तायडे 
मूर्तिजापूर - राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन सरकार स्थापन झाले निकाला पाहता मतदारांकडून वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण केले जात आहे त् त्यावर राष्ट्रशक्ती हमचालीस संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना पाचशेच्या मुद्राकांवर प्रतिज्ञापत्र देऊन ईव्हिएम मशीन हटवून बॅलेट पेपरवर मतांचे दान घेण्याची मागणी केली आहे.
             महाराष्ट्रात जनता जर्नदानाच्या विकासाकरीता सरकारची स्थापना झाली परंतु ईव्हिएम मशिनद्वारे मतदान झाले. त्यात मत पसंतीच्या उमेदवाराला न जाता नापसंतीच्या उमेदवाराला जात असल्यामुळे जनतेत मोठया प्रमाणात असंतोष निर्माण झाला शहे. व त्यामुळे मतदारांना शंका येत आहे. पूर्वी बॅलेट पेपरवर मत घेतल्या जात असे पंरतु नविन तंत्रज्ञान उाल्यामुळे बॅलेट पेपर ऐवजी ईव्हिएमच्या सहाय्याने मत घेण्याची निवडणूक आयोगा मार्फत कार्यवाही करण्यात येत आहे. प्रगत देशात ईव्हिएम ऐवजी बॅलेटवर मतदान घेण्याचा निर्णय झालेला असल्यामुळे तेथे असलेल्या मतदाराच्या शंकेचे निराकरण झाले. परंतु भारतात निवडणूक आयोगाची प्रक्रीया निपक्षपाती होत नसलयामुळे शंका येत आहे. नविन तंत्रज्ञान आल्यामुळे जसे रिमोटद्वारे टि.व्हिचे चॅनल बदलल्या जातेमोबाईल मधले पैसे काढून घेतल्या जातात तसेच ईव्हिएममध्ये दिलेली मते बदलल्या जात असल्याची शंका मतदारांना येत आहे. पूर्वी निपक्षपाती व पारदर्शक निवडणूक होत अशा पारदर्शक निवडणूकीकरीता जास्त वेळ लागला तरी बैलेट पेपरवर निवडणूका निवडणूक आयोगाद्वारे घेण्यात याव्यात अन्यथा संघटनेचे मतदार निवडणूकीवर बहिष्कार टाकतील व हे मतदार मतदानापासून वंचित राहिल्यास याची नोंद संबंधीतांनी घ्यावी असा ईशारा देत प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.
             यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बबनराव डाबेराव, बंडूभाऊ डाखोरे,मुरलीधर मुगल, रोहीत सोळंके, सुनिल वानखडे, मो. सल्लाउद्दीन, विनायकराव गुल्हाने, मोहन सदार, गणेश जोगळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या