Ticker

6/recent/ticker-posts

लाडकी बहीण योजनेचे पैसे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

लाडकी बहीण योजनेचे पैसे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा 


अकोला राज्याचे मुख्यमंत्री व सर्वांचे लाडके देवा भाऊ देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रत्येकाच्या खात्यात जमा होणार असे अभिवचन दिले असून महायुती सरकार जनतेचं सरकार असल्याचं सिद्ध केले असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात सर्वसामान्यांना दिलेलं अभिवचन पूर्ण होतील असा विश्वास विधानसभा भाजपा प्रतोद व भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच विविध महामंडळ याला निधी उपलब्ध होऊन सर्व समावेशक विकासाला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त करून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेचा कल्याण होईल असा विश्वास व्यक्त करून हे सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांची असल्याचीही त्यांनी म्हटले आहे तसेच लाडकी बहीण साठी सरकारने एक हजार कोटी रुपयांची तरतूद करून दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याचा अभिवचनाला पूर्ती करणार असून लवकरच 2100 रुपये देण्याच्या निर्णयाची सुद्धा मलबजावणी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या