विद्यार्थ्यांनी स्वतःचे दीपक स्वतःच बनावे
----------------------------------------
विशाका वाकोडे, लोकसभा भाषा अधिकारी ,नवी दिल्ली.
विद्यार्थी अवस्थेतच तुम्ही घडता. आयुष्याएवढी जिद्द कोठेच नाही.प्रसंगातून जो शिकतो तो आयुष्यात खूप मोठा होतो.ध्येयावर चालणारा व्यक्ती यशस्वी होतोच.मुलांच्या सुखासाठी आई वडील सतत झटत असतात.त्यांचा आदर्श ठेवा. कृतज्ञतेचे भाव बाळगा. संघर्ष जीवनाचा भाग आहे.शिक्षणात जिद्द ठेवा.जीवनात महान असलं पाहिजे.मोठे आयुष्य जगण्यापेक्षा महान असलेलं आयुष्य जगा.रोज नियमित अभ्यास तुम्हाला यशा पर्यंत पोहचवू शकतो असे मार्गदर्शन *विशाखा जीवनराव वाकोडे* हिने बोंडे चेंबर,कॅनरा बँक समोर मूर्तिजापूर येथे जनमंच,आंतरभारती,
प्रगती शेतकरी मंडळ मूर्तिजापूर
संचालित १० वी च्या निःशुल्क शिकवणी वर्गातील विद्यार्थिनी समोर केले.
तिची निवड लोकसभा भाषा अधिकारी(प्रथम श्रेणी )म्हणून झाली असून तिचा सत्कार प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू भाऊ वानखडे यांनी बुके देवून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने केला.
प्रास्ताविक निःशुल्क शिकवणी वर्गाचे शिल्पकार, आंतरभारती पुणे चे तालुका सचिव प्रमोद राजनदेकर यांनी केले.अध्यक्षस्थानी असलेले जनमंच नागपूरचे तालुकाध्यक्ष प्रा.सुधाकर गौरखेडे यांनीही विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.आभार राजूभाऊ वानखडे यांनी मानले.कार्यक्रमाला सचिन पवार,गोपाल तायडे,जीवनराव वाकोडे,अरुण बोंडे उपस्थित होते.
0 टिप्पण्या