Ticker

6/recent/ticker-posts

खासदार बलवंत वानखडेंचा ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनने केला सन्मान

खासदार बलवंत वानखडेंचा ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनने केला सन्मान 


तालुका प्रतिनिधी नागोराव तायडे 
मुर्तिजापूर:- अमरावती येथील खासदार बलवंत वानखडे यांनी बोधगया जाण्यासाठी अमरावतीतील नागरिकांना रेल्वे सुरु करा असा केंद्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला असता त्याला यश आले व मुंबई ते बोधगया मार्गे बडनेरा साप्ताहिक रेल्वे सुरु झाल्यामुळे काँग्रेसचे खासदार बलवंत वानखडे यांचा त्यांच्या दर्यापूर येथील निवासस्थानी ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन शाखा मुर्तिजापूर च्या वतीने आज त्यांना बुद्धमूर्ती, शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला. 


यावेळी ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन शाखा मूर्तिजापूरचे अध्यक्ष संजय गोळे, सचिव रमेश जामनिक, कार्याध्यक्ष वैभव जामनिक, कोषाध्यक्ष प्रशांत ढोकणे,अति सचिव सुभाष वर्धे, वरिष्ठ उपाध्यक्ष के.एन.कौल, कार्यालय सचिव संदीप खरे, संघटन सचिव संदीप वानखडे, उपाध्यक्ष रोहन कांबळे,सहाय्यक सचिव क्रांती कुमार मेश्राम,कार्यकारणी सदस्य राहुल इंगळे, सुभाष प्रभे,उत्तम फुलके, रोहित दाभाडे,अनिल शेंद्रे,गजानन वानखडे,विजय तेलमोरे,मोहम्मद रईस अब्दुल युनूस,निलेश तायडे युवा कार्याध्यक्ष मिलींद कवाळे,युवा सचिव ज्ञानेश्वर सिरसाट,संघटक मनोज गुरचल तथा अन्य पदाधिकारी,सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.




बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या