Ticker

6/recent/ticker-posts

अकोला पुर्वचे लोकप्रीय, तरूण ,अभ्यासू , तडफदार आ. सावरकर यांची पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर

अकोला पुर्वचे लोकप्रीय, तरूण ,अभ्यासू , तडफदार आ. सावरकर यांची पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर


अकोला
निवडणूक आयोगाने राज्यात निवडणुकीची घोषणा केल्यावर सगळेच पक्ष उमेदवाराच्या नावांची घोषणा करण्याच्या तयारीत आहेत. भाजपा ने प्रसिद्ध केलेल्या पाहिल्याचं यादीत उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अकोला पूर्व मधील आमदार रणधीर सावरकर आणि आ. प्रताप अडसड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महायुततीतील घटक पक्ष असलेल्या भाजपा ने ९९ उमेदवारांचा समावेश असलेली आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यात प्रामुख्याने उपमुखमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि धामणगाव रेल्वे ( अमरावती ) मतदार संघाचे आ. प्रताप अडसड यांचा समावेश आहे. त्यांना उमेदवारी दिल्या गेल्याने मतदार संघात मुख्यतः भाजपा कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण आहे.



अकोला पुर्वचे लोकप्रीय, तरूण ,अभ्यासू , तडफदार आमदार व प्रदेश भाजपा सरचिटणीस आ. रणधीरभाऊ सावरकर यांना पहिल्या यादी मध्ये भाजपा कडून अधिकृत उमेदवारी निश्चित झाली आहे. आज सायं 6 वा भारतीय जनता पार्टी कार्यालय, आळशी संकुल येथे आमदार रणधीर भाऊ कार्यकर्त्यांचा आशीर्वाद सहकार्य तसेच विविध क्षेत्राच्या मान्यवरांच्या शुभेच्छा व विश्वास व्यक्त करण्यासाठी आपल्या भेटीकरता उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती पत्रकाद्वारे ॲड देवाशिष सुधाकर काकड सरचिटणीस, अकोला महानगर यांनी कळविली आहे.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या