Ticker

6/recent/ticker-posts

सर्वाधिक मातृ शक्तीला योजनांचा लाभ मिळवून देऊन कर्तव्य केले पूर्ण

सर्वाधिक मातृ शक्तीला योजनांचा लाभ मिळवून देऊन कर्तव्य केले पूर्ण



अकोला नवरात्राच्या पर्वावर मातृ शक्ती यांचं जागर व भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस ला महायुती सरकारला आशीर्वाद हे आगामी विधानसभा निवडणुकी सोबत महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद मध्ये यश मिळवून देणार आहे सामाजिक व मातृ शक्तीचा सन्मान करणारा लाडका भाऊ रणधीर सावरकरयांनी आपल्या मतदारसंघात सर्वाधिक मातृ शक्तीला योजनेचा लाभ मिळवून देऊन आपली कर्तव्य पूर्ण केल्या असून नोव्हेंबर, महिन्यात होणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचे शिलेदार म्हणून सावरकर यांना विजयी करण्यासाठी आपण आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहे हेच महायुतीचे बळ असल्याचे प्रतिपादन सौभाग्यवती सुवासिनीताई धोत्रे यांनी केले. घुसर इथे मातृशक्ती संवाद नवरात्राचा जागर कार्यक्रमात त्या बोलत होत्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती सुलभाताई सोळंके हे होत्या तर आमदार रणधीर सावरकर मंजुषा ताई सावरकर 


  ,घुसर च्या सरपंच अश्विनी ताई म्हातुरकर,चंदाताई लव्हाळे,तालुकाध्यक्ष देवेंद्र देवर,अंबादास उमाळे,अनिल गावंडे,राजेश बेले,बाबुलाल कांगटे,जगदीश पागृत,दादाराव कांगटे,चंदूभाऊ खडसे,हनुमान मंदिर संस्थान घुसर चे अध्यक्ष हरीश लहरिया व मोठ्या संख्येने माता भगिनी उपस्थित होत्या. देवा भाऊ फडणवीस हे सामाजिक व महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबद्ध असणारे नेतृत्व असून सर्व समाजाला सोबत घेऊन 13 कोटी महाराष्ट्राच्या विकासासाठी माय मराठी भाषेला अभिजीत भाषेचा दर्जा देऊन विश्वामध्ये सर्वात जास्त तीन नंबर जास्त बोली बोलणारी भाषा याचा गौरव केला अशा नेतृत्वाचा आपण सन्मान करावा मोफत वीज 75 वर्षातील नागरिकांना मोफत प्रवास बस एसटी बस मध्ये मातृशक्तीला 50% सवलत मुलींना उच्च शिक्षणाची मोफत सोय हा ऐतिहासिक निर्णय घेणारे महायुतीचे सरकार आहे आतापर्यंत राज्य करणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार तसेच उद्धव ठाकरेंनी काय केलं याचा उत्तर द्यावं केवळ चांगल्या कामाला विरोध करणे हे एकमेव उद्देश घेऊन जिल्हा पासून तर राज्यस्तरावर पर्यंत देश पातळीपर्यंत यांचं काम सुरू आहे केवळ भाजपा व महायुती यांच्या स्वप्नामध्ये येत असून जनता जनार्दनाचा आशीर्वाद असल्याचा जम्मू आणि हरियाणा निवडणुकीच्या निकालावरून सिद्ध झाले असून महायुतीला लोकसभेमध्ये महाराष्ट्रात यश नाही मिळालं तर महायुतीने निराश न होता आरोप न करता सातत्याने जनसंपर्क ठेवून जनतेचा विश्वास संपादन केला त्यामुळे प्रत्येक ठिकाणी अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात दहा हजार पेक्षा जास्त मातृ शक्ती उपस्थित राहून महायुतीला आशीर्वाद देत आहे आणि हेच आशीर्वाद विधानसभा निवडणुकीमध्ये विजय प्राप्त करून देणार आहे प्रत्येक बाबतीत भेदभाव करणारे जिल्हा परिषद योजनेमध्ये भेदभाव करणारे भारिप बहुजन महासंघ व उभातासेना कोणाच्या पाठीशी आहे हे जनतेला माहित आहे त्यामुळे जनतेशी थेट संवाद साधणारे 24 तास जनतेच्या सेवेत उपस्थित राहणारे आमदार रणधीर सावरकर यांना बळ द्या असे आव्हान अकोला पंचायत समिती सभापती सुलभाताई सोळंके यांनी केले यावेळी मातृशक्ती नवरात्राच्या परवावर मोठ्या संख्येने ग्रामीण भागामध्ये आपलं कामकाज सोडून महायुतीला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहे हेच विजयाचे प्रतीक असून नवरात्राच्या परवावर संकल्प घेऊन महायुतीला महाराष्ट्राच्या विकासासाठी विजयी करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात सरकार आणा असे आव्हान आमदार रणधीर सावरकर यांनी केले अकोला शहराला असाल तर अशांत करण्याचा प्रयत्न होत असल्याचा सांगून हिंदूंच्या सणावर असा प्रकार होत असेल तो सहन केला जाणार नाही पोलीस प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी जनतेचा उद्रेक होणार नाही याची दखल घ्यावी असेही आव्हान आमदार सावरकर यांनी केले प्रशासनाला शांतता राखण्यासाठी सहकार्य करावे व कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवता शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे सांगून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एक रुपयात पिक विमा योजना सुरू करणारा महाराष्ट्र एकमेव राज्य असल्याची ही सांगितले.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या