जुन्या शहरात वारंवार होणारी घटना बघता सीसीटीव्ही कॅमेरे, पोलीस चौकी त्वरित सुरू करावी- आ. सावरकर
अकोला असामाजिक तत्त्वावर वचक म्हणून पोलीस प्रशासनाने कारवाई करावी व जुन्या शहरात वारंवार होणारी घटना चिंताजनक असून यासंदर्भात पोलीस प्रशासनाने उभारलेल्या पोलीस चौकी त्वरित सुरू करावी तसेच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे तसेच असामाजिक तत्त्वावर योग्य ती कारवाई करावी तसेच कमी वेळात एवढ्या मोठ्या प्रमाणात दगड कशी जमा झाले याच्या शोध घ्यावा व यामधील मास्टर माईंड याला शोध घ्यावा कठोर कारवाई करून अटक करावी अशी निर्देश देऊन मातृ शक्ती व नागरिकांची संवाद साधून नवरात्र पर्व आणि धम्मचक्र दिवस दिवाळी सण निर्भयपणे साजरा करावा राज्य शासन व पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करेल असे अभिवचन आमदार रणधीर सावरकर यांनी दिले. हरिहर पेठ या भागामध्ये घटना घडल्यावर घटनास्थळी जाणारे लोकनेते आमदार रणधीर सावरकर यांनी आज हरिहर पेठ गाडगे नगर शिवसेना वसाहत या भागांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधला व पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन निरपराध व्यक्तींवर कारवाई होणार नाही असे अभिवचन प्रशासनाकडून घेतले.
यावेळी जखमी झालेले तोडफोड झालेले घटनेची पाहणी केली असामाजिक तत्व अशा पद्धतीने शहराचा वातावरण बिघडत असेल तर त्यांचा योग्य तो बंदोबस्त करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून आपण कायद्याचा पालन करावे व आपल्यामुळे कोणाच्या भावना दुखवणार नाही याची दक्षता सुद्धा प्रत्येक नागरिकांनी घ्यावी छोट्या-मोठ्या गोष्टीचा अफवांमध्ये प्रसर न करता शहरांमध्ये व जिल्ह्यामध्ये अशांतता निर्माण होईल असा प्रयत्न काही लोक करत असले तरी याला बळी न पडता शांततेने संयमाने पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे जिल्हा प्रशासक योग्य ती कारवाई करण्यासाठी कटिबद्ध असून राज्याचे गृहमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात आदेश दिले आहे तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील घटनास्थळावर लक्ष ठेवू न व सातत्याने प्रशासनाची संपर्कात आहे यावेळी त्यांनी घराची पाहणी नागरिकांच्या भावना आक्रोश ऐकून प्रशासनाला सूचना दिल्या मनपा प्रशासन जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन यांच्यासोबत त्यांनी पाहणी केली व लोकांच्या भावना तक्रारी ऐकून घेतल्या व त्यावर अंमलबजावणी करण्याचे निर्देश सुद्धा दिले यावेळी माजी महापौर विजय अग्रवाल किशोर पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख अश्विन नवले जयंत मसने संजय गोटफोडे , कृष्णा शर्मा अमोल गीते अमोल गोगे, दिलीप मिश्रा सुनील बाटे, उमेश गुजर निलेश निनोरे सुनील कांबळे डॉक्टर संजय ढोरे गजानन वाडेकर विजय चौधरी अमोल मोहकार एडवोकेट देवाशिष काकड मंगेश सावरकर संजय जीरापुरे, हेमंत शर्मा अक्षय जोशी गोपाल झापडे अतुल अग्रवाल चंदा ठाकूर बेबीताई गीते, गणेश श्रीनाथ आधी आधी त्यांच्यासमवेत होते.
0 टिप्पण्या