अकोला पुर्व मधुन साधा, सरळ व उच्चशिक्षित अजाबराव ताले यांचा उमेदवारी अर्जा दाखल
जिल्ह्यातील अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एका उमेदवाराकडून नामनिर्देशन पत्र दाखल झाले. अकोला पूर्व मतदारसंघात साधा, सरळ व उच्चशिक्षित अजाबराव टाले (अपक्ष) यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. अकोला पश्चिम मतदारसंघात डॉ. धनंजय प्रल्हादराव नालट यांनी बहुजन समाज पार्टीतर्फे ३ अर्ज दाखल केले. अजबराव ताले मागील अनेक वर्षापासून विदर्भासाठी व विदर्भ विकासासाठी काम करीत आहेत.
दोन मतदारसंघात प्रत्येकी एका उमेदवाराकडून नामनिर्देशन दाखल
अकोला, दि. 24 : जिल्ह्यातील अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एका उमेदवाराकडून नामनिर्देशन पत्र दाखल झाले.
अकोला पूर्व मतदारसंघात अजाबराव टाले (अपक्ष) यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. अकोला पश्चिम मतदारसंघात डॉ. धनंजय प्रल्हादराव नालट यांनी बहुजन समाज पार्टीतर्फे ३ अर्ज दाखल केले.
अकोला पूर्व मतदारसंघात आज 2 जणांनी 8 अर्जांची उचल केली. आतापर्यंत 35 जणांनी 58 अर्जांची उचल केली.
अकोला पश्चिम मतदारसंघात आज 18 व्यक्तींनी 43 अर्जांची उचल केली. आतापर्यंत 68 व्यक्तींनी 130 अर्ज नेले.
मूर्तिजापूर मतदारसंघात आज 15 व्यक्तींनी 29 फॉर्मची उचल केली. आतापर्यंत 42 व्यक्तींनी 99 अर्जांची उचल केली.
अकोट मतदारसंघात आज 15 व्यक्तींनी 25 अर्जांची उचल केली. आतापर्यंत 64 व्यक्तींनी 102 अर्जांची उचल केली. बाळापूर मतदारसंघात आज 10 व्यक्तींनी 23 अर्जांची उचल केली. आतापर्यंत 42 व्यक्तींनी 83 अर्जांची उचल केली.
0 टिप्पण्या