सीताबाई महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा
अकोला दि. स्थानिक सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला येथील एनसीसी सब युनिटमधील कॅडेट एस. यु.ओ.कु.प्रीती चव्हाण हिने ह्यावर्षीचा अमरावती एनसीसी ग्रुपमधील 'आल राऊंडर बेस्ट कॅडेट'चा(2024) किताब पटकाविला. सीताबाई महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. आर. डी. सिकची सरांनी एस.यू. ओ.कु. प्रीती चव्हाण हिचे भरभरून कौतुक केले. एनसीसीचे कार्यवाहक डॉ. हरिचंद नरेटी तसेच महाविद्यालयातील प्रा. भास्कर धारणे, प्रा. दिलीप कुमरे, प्रा. सुभाष दामोदर, डॉ. कैलास वानखडे, डॉ. प्रसन्नजीत गवई, डॉ. संतोष कुलकर्णी, डॉ. सुनील गायगोल, डॉ. भारती पटनायक, डॉ. गोविंद येललकर, डॉ.कौमुदिनी क्षीरसागर बर्डे, डॉ. स्नेहल शेंबेकर डॉ. बाळासाहेब जोगदंड, डॉ. नीरज लांडे, डॉ. उमेश चापके, डॉ. अजय सोळंके, डॉ. नाना भडके, डॉ. अमोल गावंडे प्रा. सुनीता डाबेराव, प्रा. प्रमोद मार्कंडे या सर्व आदरणीय प्राध्यापकांनी एस. यू. ओ.कु.प्रीती चव्हाण हिचे भरभरून कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या