खेंडकर विद्यालयात विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दल शिक्षक दिनी व्यक्त केली कृतज्ञता
जुना वाशिम बायपास स्थित खेंडकर विद्यालयामध्ये दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. विद्यार्थी या दिवशी त्यांच्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता आणि कौतुक व्यक्त करतात. महान शैक्षणिक तत्ववेत्ता, आणि एक प्रख्यात मुत्सद्दी, विद्वान, भारताचे दुसरे उपराष्ट्रपती आणि महान शिक्षक सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून पाळला जातो. 5 सप्टेंबर रोजी वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन केले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक निलेश खेंडकर यांच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी वर्ग दहावीतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षिकांना पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञता व्यक्त केली. दरम्यान यावेळी कॉन्व्हेंट विभाग, प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनसाठी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनपटावर आधारित भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी भाषणाद्वारे डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला. तसेच यावेळी शिक्षिका स्वाती कापसे, मनीषा अंभोरे, सुकेशनी ओहेकर, छाया इंगळे यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे उदाहरण व कथा सांगून शिक्षक दिनाचे महत्त्व पटवून सांगितले. तर माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक निलेश खेंडकर यांनी आपल्या भाषणातून गुरु द्रोणाचार्य व शिष्य एकलव्य यांची कथा सांगून गुरु शिष्याचे महत्व पटवून दिले आणि भाषणाच्या शेवटी सुरेल कविता गाऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. सदर कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी पार पाडण्यासाठी वर्ग दहावीतील विद्यार्थी चैतन्य भागडे, यश चव्हाण, भावेश चौधरी, दर्शन बाळापुरे, धीरज खिरेकर, नेहा मुंडे, निशा येहेकार, राजनंदनी मंडलवार, नम्रता मालगे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन कांचन वानखडे यांनी केले. यावेळी शाळेतील शिक्षक आशा हिवरकर, उषा जगदाळे, सुरेश सुरत्ने, प्रज्ञानंद थोरात, श्रीकांत पागृत, गोपाल वानखडे, प्रशांत काळे, मनीषा अंभोरे, अश्विनी सोळंके, सुकेशनी ओहेकर, छाया इंगळे, अंजु मुंढे, रूपाली उन्हाळे, मिना घाटोळे, यामीनी उपश्याम, शारदा पांडे, कांचन तायडे, स्वाती कापसे आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. तर शिक्षकेत्तर कर्मचारी मंजूताई कदम व संतोषदादा कदम यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या