Ticker

6/recent/ticker-posts

दोन मुलांना तुडवून दुचाकीस्वार फरार, पोलीसांचा तपास सुरू

दोन मुलांना तुडवून दुचाकीस्वार फरार, पोलीसांचा तपास सुरू

अकोला
एम सादिक हार्डवेअर, अकोट अकोला रोड समोर एका मोटारसायकल ॲक्टिव्हा दुचाकीस्वाराने दोन मुलांवर धडक देऊन पळ काढला. ही घटना सकाळी 6 वाजता घडली आहे. आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार असल्याने ही दोन मुले त्यांच्या घराजवळील शेडवर बसली असताना अचानक ॲक्टिव्हाने त्यांना चिरडले व ते वाहन मागे सोडून पळून गेले. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस कर्मचारी तात्काळ तेथे पोहोचले व त्या मुलांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांची प्रकृती चिंताजनक आहे. मोटारसायकलची झडती घेतली असता दोन छायाचित्रे पोलिसांना आढळून आली असून पुढील तपास अकोट पोलीस करत आहेत. या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहने नंबरप्लेट नसतानाही फिरत असतात, त्यामुळे अपघात टाळता यावेत यासाठी वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई करण्याची गरज आहे.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या