Ticker

6/recent/ticker-posts

रेस्क्यु बोटीसह रेस्क्यु टीम गांधीग्राम येथील पुर्णा नदीवर सज्ज

रेस्क्यु बोटीसह रेस्क्यु टीम गांधीग्राम येथील पुर्णा नदीवर सज्ज
 

प्रतिनिधी -संतोष माने 
मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर ची टीम रेस्क्यु बोट,शोध व बचाव साहित्य आणी रुग्णवाहीकासह पुर्णा नदीपात्रात गांधीग्राम येथे सज्ज झाली आहे

          सविस्तर वृत्त येथे 👆 पहावे..

अकोला आज जिल्हाधिकारी अजित कुंभार सर यांच्या आदेशानुसार आरडीसी विजय पाटील सर यांच्या उपस्थितीत उप-विभागीय अधिकारी डाॅ.शरद जावळे सर यांचे मार्गदर्शनात अकोला तहसीलदार सुरेश कव्हळे सर आणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे साहेब,तलाठी हरीहर निमकंडे यांचेसह मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जिवरक्षक दिपक सदाफळे यांच्या नेतृत्वात त्यांचे सहकारी मयूर सळेदार,अंकुश सदाफळे, महेश वानखडे,निलेश खंडारे,विकास सदांशिव, निखील बोबडे,ऋषिकेश राखोंडे,जितेंद्र केवट,धिरज राऊत,अमर ठाकूर,हे सज्ज झाले आहेत उद्याची श्रावणातील चौथा सोमवार असल्याने गांधीग्राम येथील पुर्णा नदीवर कावडधारी शिवभक्त जलाभिषेक नेण्यासाठी मोठ्याप्रमाणात येऊ शकतात झालेल्या दमदार पावसामुळे पुर्णा नदीला मोठा पुर असल्याने नदी दुथळी भरुन वाहत आहे याची दक्षता घेऊन पुर्व तयारीनिशी यंत्रणा तयार ठेवण्यात आली आहे अशी माहीती अकोला आ.व्य. अ.संदीप साबळे यांनी दीली आहे.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या