Ticker

6/recent/ticker-posts

बदलापूर सह अकोला ही पेटलं, शिक्षकाचा सहा विद्यार्थीनींसोबत अत्याचाराचा धक्कादायक प्रकार

बदलापूर सह अकोला ही पेटलं, शिक्षकाचा सहा विद्यार्थीनींसोबत अत्याचाराचा धक्कादायक प्रकार

अकोला
मुंबई परिसरातील बदलापूरच्या शाळेत दोन मुलीवर लैगिंक अत्याचार घडल्याने, संपूर्ण बदलापूर पेटलं असून रेल्वे सेवा बंद ठप्प झाली, नागरिकांनी रस्तावर चक्काजाम केला आहे. राज्यभरातून बदलापूर घटनेवर निषेध व्यक्त करण्यात येत आहे. राज्य सरकारने याप्रकरणी कारवाई जलद केली आहे. त्यात आज 20 ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या सुमारास अकोल्यातही घृणास्पद प्रकार घडला आहे. अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यात काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकाने सहा विद्यार्थीनींसोबत अत्याचार केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.


 सदर घटना अशी की शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवत सहा विद्यार्थीनींचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. बदलापूर येथील घटना समोर येत नाही तोच अकोल्यातही शाळेतील अल्पवयीन मुलींवर अत्याचारामुळे जिल्हा हादरून गेला आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आज मंगळवारी संध्याकाळी उघडकीस आली. याप्रकाराने जिल्हाभरात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. मागील चार ते पाच महिन्यांपासून आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनींना अश्लील व्हिडिओ दाखवत शिक्षकाने मुलींना चुकिच्या पद्धतीने स्पर्श करत वाईट संभाषण केला असल्याचा आरोप या शिक्षकांवर विद्यार्थीनींनी केला आहे. सर्व प्रकार विद्यार्थिनींनी पालकांना सांगितल्यानंतर त्यांना धक्का बसलाय. संतप्त झालेल्या पालकांनी उरळ पोलिसांकडे धाव घेत शिक्षकांविरोधात तक्रार दाखल केली असून याप्रकरणी उरळ पोलिसांनी शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा शिक्षक प्रमोद सरदार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बदलापूर येथील घटने सोबतच अकोल्यात सहा अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याप्रकरणी राज्य महिला आयोग काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या