Ticker

6/recent/ticker-posts

स्थानीक गुन्हे शाखा अकोला कडून अवैधरित्या गावठी पिस्टल बाळगणा-यावर कारवाई, आरोपीसह गावठी पिस्टल व जिवंत काडतुस असा एकुण ७१ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत

स्थानीक गुन्हे शाखा अकोला कडून अवैधरित्या गावठी पिस्टल बाळगणा-यावर कारवाई, आरोपीसह गावठी पिस्टल व जिवंत काडतुस असा एकुण ७१ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत

अकोला
आज दिनांक १५ जुन २०२४ रोजी स्थानीक गुन्हे शाखा, अकोला येथील पोउपनि गोपाल जाधव व पथकास येणा-या बकरी ईद सना निमीत्याने अवैधधंद्यावर कार्यवाही करणे बाबत पो.नि श्री. शंकर शेळके यांनी आदेशीत केले असता पथक हे बाळापूर उपविभागात अवैधधंद्यावर रेड करणे कामी पेट्रोलींग करीत असता, त्यांना गोपनिय माहीती प्राप्त झाली की एक ईसम हा उरळ ह‌द्दीतील कवठा गावाचे जवळ त्याचे ताब्यात गावठी पिस्टल बाळगून आहे अश्या मिळालेल्या माहीती वरून पथकाने माहीतीचे गांभीर्य पाहून सापळा रचून गावठी पिस्टल बाळगणा-या ईसमास शिताफीने ताब्यात घेवून आरोपी नामे रघूविर तेलसिंग चौहाण वय ३० वर्ष रा. फुकट पुरा जलाराम मंदीर जवळ जळगाव जामोद जि. बुलढाणा याचे जवळील एक गावठी पिस्टल (अग्निशस्त्र) ०५ जिवंत काडतुस त्याचे कडील वाहन व ईतर साहीत्य असा एकुण ७१,०००/-रू चा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुध्द कलम ३,२५ आर्म अॅक्ट सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात येत असून आरोपीस पुढील तपास कामी पो. स्टे उरळ यांचे ताब्यात देण्यात येत आहे.


सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे साहेब, पो.नि श्री. शंकर शेळके स्थागुशा अकोला यांचे मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखा अकोला चे पोउपनि. गोपाल जाधव, पो. अंमलदार रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, गोकूळ चव्हाण, वसीम शेख, भिमराव दिपके, चालक पो. हवा अक्षय बोबडे यांनी केली आहे.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या