Ticker

6/recent/ticker-posts

दोन गट आमने-सामने बोरगाव मंजू मध्ये तणावपूर्ण शांतता

दोन गट आमने-सामने बोरगाव मंजू मध्ये तणावपूर्ण शांतता 


अकोला
प्रतिनिधी - संतोष माने 
गोवंश तस्करी कत्तलीसाठी नेत असताना अडविले असता अडविणाऱ्या विरुद्ध कत्तल खाना चालविणाऱ्यांनी  केला राडा. बोरगाव मंजू परिसरातील फरशी चौक येथील आज 27 मे रोजी संध्याकाळच्या सुमारास गाय कत्तलीसाठी नेत असताना वाद निर्माण झाला दोन्ही कडील जनसमुदाय आमने-सामने झाले. त्यामुळे बोरगाव मंजू गावात छावणीचे स्वरूप निर्माण झाले असून कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. दोन्ही समुदायाची लोक बोरगाव मंजू पोलीस स्टेशनमध्ये हजर असून कोणत्याही प्रकारचा अद्याप पर्यंत गुन्हा दाखल झाला नाही.


         सविस्तर वृत्त येथे 👆 पहावे..

बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीमध्ये फरशी चौक धनगर पुरा येथून गाई तस्करीसाठी नेत असताना अडविले असता गो तस्करांनी राडा निर्माण केला, यामध्ये एक युवक गंभीर जखमी झाल्याने त्याला अकोला रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले आहे. यामुळे दोन समुदायांमध्ये वातावरण तापले असता बोरगाव मंजू पोलीस बोरगाव मंजू गावात संचारबंदी लागू केली आहे. या संदर्भात पुढील कारवाई सुरू असल्याने कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नाही. सध्या बोरगाव मंजूूू मध्ये तणावपूर्ण शांतता असून जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग प्रत्यक्ष भेट देणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. तरी नागरिकांना बोरगाव मंजु पोलिसांनी शांततेचे आव्हान केले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या