कुरणखेड टोल नाक्यावर स्थानिक नागरिकांना वाहनांसाठी टोल सुट द्या!
परिसरातील वाहन धारकांची बैठकीत चर्चा,
संबंधितांना देणार निवेदन
प्रतीनीधी- राहुल खाडे
कुरणखेड
अकोला- जिल्ह्यातील कुरणखेड टोल प्लाझा टोल नाक्यावर कुरणखेड सह परिसरातील हाकेच्या अंतरावरील गावातील सर्व प्रवासी गैर वाणिज्यिक चार चाकी नोंदणीकृत वाहनांच्या टोल रद्द करण्याची मागणी कुरणखेड सह परिसरातील गावातील नागरिक करीत आहेत, नुकतीच सोमवारी शेकडो वाहनधारकांन सह नागरिकांनी एक सभा घेऊन मागणी केली आहे, संबंधित मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अकोला, राष्ट्रीय महामार्ग ५३ अमरावती विभाग यांना निवेदन देवून मागणी करण्यात येत आहे, कुरणखेड सह परिसरातील नागरिकांना टोल नाक्यावर सुट मिळाली नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे, राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरी महामार्ग क्रमांक एन एच. ५३ मार्फत काम पूर्ण झाल्यानंतर कुरणखेड येथे टोल नाका उभारण्यात आला आहे, दरम्यान ७६ कि मी लांबीच्या रस्त्यासाठी शुल्क वसूल करण्यात येत आहे, परंतु कुरणखेड हे परिसरातील गावांचे मध्यवर्ती ठिकाण आहे, येथे दवाखाना,आठवडी बाजार, बँक, शाळा, महाविद्यालय, शेती अवजारे साहित्य दुकाने, कृषी सेवा केंद्र, आदी मार्केट असल्याने सर्व सामान्य माणसाला दैनंदिन आपल्या गरजा भागविण्यासाठी कुरणखेड येथे दिवसातच वारंवार यावे लागते, त्यामुळे मासिक पास जरी सुविधा प्रयोजन असले तरी तो नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे, हा टोल नाका दिनांक २० डिसेंबर २०२२ रोजी सुरू झाल्यानंतर प्रारंभी कुरणखेड सह परिसरातील हाकेच्या अंतरावरील गावातील लोकांना कुरणखेड टोल नाका सुट मिळाली होती, परंतु गत काही दिवसांपासून संबंधित कंत्राटदाराने कुरणखेड सह परिसरातील हाकेच्या अंतरावरील गावातील प्रवासी गैर वाणिज्यिक चार चाकी वाहनांसाठी टोल आकारणी करून नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे,हा टोल नाक्यावर कुरणखेड सह परिसरातील हाकेच्या अंतरावरील गावातील लोकांना सुट मिळण्याबाबत सोमवारी सायंकाळी कुरणखेड येथे परिसरातील कुरणखेड , पातुर नंदापुर,दुधलम,दाळंबी, कोळंबी, मिर्झापूर, मुस्तफापुर, बोरगाव खुर्द,जवळा,वाळकी,खडका,ताणखेड,बिरसिंगपुर,पैलपाडा, वणी रंभापुर,ढगा कोठारी, आदी चार ते पाच किलोमीटर अंतरावरील गावातील वाहन धारका सह गावचे सरपंच,उपसरपंच सह प्रतिष्ठित नागरिकांनी एक सभा आयोजित केली होती, या सभेत सर्वानुमते विचार विनिमय करून कुरणखेड टोल नाक्यावर स्थानिक नागरिकांना टोल आकारणी रद्द करण्यात यावी यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी अकोला यांच्या सह संबंधित विभागाला निवेदनाद्वारे मागणी केली जाईल, टोल नाका सुट मिळाला नाही तर भविष्यात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे
प्रतिक्रिया
राष्ट्रीय महामार्गावर कुरणखेड गावा मधे उभारण्यात आलेला टोल नाक्यावर कुरणखेड सह परिसरातील गावातील वाहनांची टोल वसुली घेतली जात आहे,
या संदर्भात आम्ही संबंधित विभागाशी संपर्क साधला असता प्रारंभी कंत्राट कंपनीने टोल सुट दिली होती मात्र आता नव्याने आलेली कंपनी हे टोल वसुली करत आहे हा अन्याय आम्ही सहन करणार नाही परीसरातील सर्व गावांना टोल माफी झाली पाहिजे अन्यथा आम्ही मोठे जन आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे.
तसेच कुरणखेड हे गाव मध्यवर्ती ठिकाण येथे परिसरातील खेडे गावातील लोकांना दैनंदिन बाजारपेठ सह इतरही कामासाठी यावे लागते,तर परिसरातील किमान २० खेडे गावातील लोकांची वर्दळ असते, ही गावे जोडून आहेत, परीसरातील गावांचा अंत्यंत महत्त्वाचा प्रश्न असुन , हाकेच्या अंतरावरील गावातील लोकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे, कुरणखेड सह परिसरातील हाकेच्या अंतरावरील गावातील वाहनांना टोल सुट देण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्या शिवाय पर्याय नाही, असे समन्वयक कुरणखेड टोल नाका आंदोलनाचे योगेश विजयकर, प्रशांत पांडे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
0 टिप्पण्या