Ticker

6/recent/ticker-posts

चला पक्ष्यांना पाणी पाजू या, त्यांची तहान भागऊ या !

चला पक्ष्यांना पाणी पाजू या, त्यांची तहान भागऊ या !



 अकोला 
पाणी हे जीवन आहे. भूतलावरील प्रत्येक सजीव श्रुष्टीला आपली पाण्याची गरज भागविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. सध्या आपल्या वातावरत मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होऊन उन्हामुळे सामान्य नागरिकांना उष्माघातासारख्या भयंकर परिस्थतीला सामोरे जावे लागत आहे. जिल्हा प्रशासनाने याकरिता योग्य काळजी व नियोजन केले आहे. पण या निसर्ग निर्मित रचनेमध्ये प्राणी हा मुख्य घटक आहे, त्यांना दुर्लक्ष्य करून चालणार नाही. याकरिता मागील १० वर्षांपासून "चला पक्ष्यांना पाणी पाजू या, त्यांची तहान भागऊ या" हा उपक्रम गौरक्षण रोडवर राबवण्यात येत आहे. यावर्षी सुद्धा मराठी नववर्षाचे निम्मित साधून दिनांक ९/४/२०२४ रोजी संध्याकाळी ६;०० वाजता एकविरा मैदान येथे संपन्न होणार आहे. 


समाजातील तरुण युवक या उपक्रमाकरिता समोर येऊन नि:स्वार्थ सेवाभावाने हातभार लावत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन श्री. सचिन मातळे- कार्यक्रम संकल्प ना व नियोजन,सोबत सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर असणारे श्री. अल्केश खेंडकर- राज्य उपाध्येक्ष,खाजगी शिक्षक संघटना,महाराष्ट्र, श्री. योगेशभाऊ अग्रवाल-शिवसेना, (शिंदे गट) शहर प्रमुख, श्री. स्वरुपकुमार शिंदे, श्री. संतोष पाचपोर, श्री. दीपेश काशीद, श्री.प्रशांत वाहिले, श्री. अभिषेक सोरटे, श्री. सतीश गुप्ता व समाजातील सर्व मार्गदर्शक याकरीता हातभार लावणार आहे. 
 आयोजक श्री. सचिन मातळे यांनी निसर्गप्रेमींना या उपक्रमात हातभार लावण्याचे आव्हान केले आहे. यामध्ये पक्षी पात्र दान स्वरूपात करण्यासाठी आपण पात्र देण्याचे आव्हान केले आहे. याकरिता नागरिकांनी ८ एप्रिल पर्यंत देवी प्लाझा, गौरक्षण रोड, अकोला किंवा ८४५९७१२७३७ यावर संपर्क करावा. सदर काऱ्यर्क्रमाला आपण सर्वानी मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहावे हि नम्र विनंती आयोजक मित्र मंडळी मार्फत करण्यात येत आहे. अशी माहिती अल्केश खेडकर यांनी पत्रकार द्वारे कळविली आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या