Ticker

6/recent/ticker-posts

अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजपा तर्फे उमेदवार म्हणून अनुप धोत्रे जाहीर

अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजपा तर्फे उमेदवार म्हणून अनुप धोत्रे जाहीर 


अकोला
भारतीय जनता पार्टी केंद्रीय निवडणूक समितीची बैठक 11 फेब्रुवारी 2024 रोजी जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय निवडणूक समितीचे इतर सदस्य या बैठकीत उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणूक 2024 साठी केंद्रीय निवडणूक समितीने भारतीय जनता पार्टी केन्द्रीय कार्यालय अंतर्गत यादी जाहीर करुन मान्यता दिली आहे. सदर यादी मधे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांची घोषणा करण्यात आली आहे. सदर निर्णयाचे स्वागत संपूर्ण जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांनी केले आहे.

अनुप धोत्रे यांचा परिचय व कारकीर्द....

पुर्ण नाव  अनुप संजय धोत्रे असून  त्यांचा जन्म २४ मे १९८४ ला झाला आहे. गाव पळसो बढे ता. जि. अकोला असुन सध्या रणपिसे नगर, अकोला येथे राहतात. शिक्षण बि. कॉम (सिंबायोसिस महाविद्यालय) पुणे येथे झाले आहे. उदमशीलता अकोला औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग समूह असुन, अनुप इंजिनिअरिंग कसो, सोनल इविनि अरित वर्क्स, नकुल उद्योग, स्प्रिंकलर सेट्स, एचडीपीड़ पाईप्स उत्पादन रेपोल प्लास्टिक करिता, थर्मल पॉवरप्लांट्स करिता जांच वर्क, अन्न प्रक्रिया युनिट, बांधकाम आणि शहरी भु-विकास आदी व्यवसाय ते सांभाळतात. पत्नी सौ. समीक्षा अनुप धोत्रे तर वडील संजय शामराव धोत्र असुन ते खासदार तथा माजी केंद्रीय राज्य मंत्री, भारत सरकार नवी दिल्ली, अध्यक्ष- कषी विज्ञान केंद्र, अकोला येथे कार्यरत आहेत. आई सौ. सहासिनी संजय धोत्रे असुन सदैव भाजपा महीला आघाडी मधे सक्रिय आहेत. 

राजकीय व सामाजिक कारकीर्द 

२०२४ अकोला लोकसभा निवडणूक प्रमुख, भारतीय जनता पक्षा कडून राबविण्यात आलेल्या पक्षीय आंदोलनात पुढाकार सामाजिक कार्यकर्ते विशेषतः युवकांच्या विकासात्मक क्षेत्रात सहभाग व रुची, प्रभारी-सोशल मिडिया विभाग ९/१०/२०२३ संयोजक अकोला लोकसभा मतदार स्तरीय महा आरोग्य, शिबिराचे यशस्वी रित्या आयोजन. सुमारे ३५ हजार रुग्णांची नोंदणी व तपासणी शिबिरात विविध समाज घटकातील गरजू रुग्णांची मोफत तपासणी व मदत, २०१४ व २०१९ लोकसभा व विधानसभा निवडणुकीत युवकांचे संघटन मजबुती करिता बूथ, नगर व वार्ड स्तरांवर नियोजनबद्ध बैठका घेऊन मुख्यमंत्री, चषकाचे अयोजन व मोठ्या प्रमाणात युवकांचा सहभाक करून घेण्याचे कार्य २०१४ व २०१९ लोकसभा / विधानसभा निवडणुकीत सोशल मिडिया चॉररूम च्या माध्यमातून शेवटच्या मतदारापर्यंत संपर्क अभियान प्रभावीपणे राबविण्यात प्रमुख भूमिका, भाजपा अकोला लोकसभा प्रचार प्रमुख, प्रयोगशील व प्रगतीशील शेतकरी (विशेषतः कापूस उत्पादन), कृषी विज्ञान केंद्र, अकोला, सचिव, GICTS ग्रुप ऑफ इन्स्टीट्युटस, म्वाल्हेर, उपाध्यक्ष, अभिनव बाल शिक्षण प्रशिक्षण मंडळ, अकोला, संचालक - नीलकंठ सहकारी सूत गिरणी, अकोला आदी राजकीय व सामाजिक कार्यात ते सदैव तत्पर असतात. 


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या