शिक्षण संस्था अध्यक्ष व मुख्याध्यापक यांचेवर गुन्हा दाखल
मा. शालेय न्यायाधिकरणाचे आदेश असतानाही शाळेत रुजू केले नाही
अकोला पब्लिक एजयुकेशन सोसायटी मूर्तिजापूर अकोला द्वारा संचालित नशनल उर्दू हायस्कुल नायगावं येथे कार्यरत प्रयोगशाळा परिचारक सय्यद आजझुद्दीन जहरुद्दीन यांना शाळा व्यवस्थापनाचे अध्यक्ष नसीर अहमद व मुख्याध्यापक जैद अहमद यांनी खोटे कारण देऊन सेवेतून बडतर्फ केले होते. त्या बडतर्फी विरॊधात शिक्षणाधिकारी अकोला येथे न्याय मागण्यासाठी गेल्यानंतर त्यांचेही आदेश न माणल्याने मा. शालेय न्यायाधिकरण अमरावती येथे याचीका दाखल केली होती या दोन्ही ठीकाणी आदेश असतानाही शाळा व्यवस्थापन अध्यक्ष व मुख्याध्यापक यांनी बडतर्फ कर्मचाऱ्याला शाळेत रुजू करून घेण्याचे आदेश असतानाही त्यांना रुजू करून घेण्यास नकार देऊन शाळेतून हाकलून लावले. हा प्रकार म्हणजे मा. शालेय न्यायाधिकरणाने दिलेल्या आदेशाचा अवमान आहे. त्यामुळे अध्यक्ष नसीर अहमद व मुख्याध्यापक जैद अहमद यांचे विरोधात गुन्हा सिद्ध होत असल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून खटला चालवावा असा आदेश विद्य उच्च न्यायालयाने दिला आहे. सोबतंच विद्य. न्यायालयात दाखल याचिका खारीज करण्यात आली. या प्रकरणी पीडितेची बाजू ऍड. सी ए. दंदी व नागपूर हायकोर्टाचे ऍड. पराग कडू यांनी मांडली
0 टिप्पण्या