Ticker

6/recent/ticker-posts

देशवासियांना जोडून ठेवणारी पंतप्रधान नरेंद्रजी मोदींचा ११० वा 'मन की बात' - आमदार सावरकर

देशवासियांना जोडून ठेवणारी पंतप्रधान नरेंद्रजी मोदींचा ११० वा 'मन की बात' - आमदार सावरकर



 अकोला : प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची वाणी ऐकायला मिळणं, ही एक पर्वणीच ! 'मन की बात'च्या माध्यमातून नरेंद्रजी मोदींनी हा पूर्ण देश जोडून ठेवल्याचे भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी म्हटले आहे. देशाचे यशस्वी, सक्षम आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी रविवार दि. २५ फेब्रुवारी २०२४ रोजी "मन की बात" या कार्यक्रमातून देशातील नागरिकांना संबोधित केले.


पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जनतेशी थेट संवाद "मन की बात" भाग ११० वा भाग आॅल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून थेट प्रसारण दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता झाला. प्रत्येक देशवासियांना प्रेरणा देणारा हा कार्यक्रम होता. त्यावेळी मोलाचे मार्गदर्शन पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केले. भाजपा कार्यालयात मन की बात कार्यक्रम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र 'मन की बात' कार्यक्रम पाहिला. आमदार सावरकर सोबत आमदार वसंत खंडेलवाल अनुप धोत्रे विजय अग्रवाल जयंत मसणे किशोर पाटील तेजराव थोरात माधव मानकर संतोष पांडे निलेश निनोरे गणेश अंधारे एडवोकेट देवाशिष काकड काकड रमेश करिअर, संदीप गावंडे राहुल देशमुख चंदा शर्मा सुमन ताई गावंडे गीतांजली शेगोकार वैशाली शेळके माधव मानकर सजयगोटफोडे, अंबादास उमाळे देवेंद्र देवर वैशाली निकम बळीराम सिरस्कार चंद्रशेखर पांडे विजय मालोकार श्रीकृष्ण मोरखडे गणेश तायडे किशोर कुचके पंकज पळसपगार आमपाली उपरवट,हरीश आलिम चंदानेनीआदींनी मोदीजींचे विचार अनुभवले. यावेळी त्यांच्या समवेत भाजपा माजी नगरसेवक मंडळ पदाधिकारी विवेक भरणे शंकरराव वाकोडे मधुकर पाटकर अशोक राठोड रामदास तायडे कृष्णा शर्मा गिरीश जोशी अक्षय जोशी मोहन पारधी जिल्हा पदाधिकारी पदाधिकारी आदि उपस्थित होते. मन की बात हा एक असा प्लॅटफॉर्म आहे, जिथे या देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा मिळते, त्यासोबतच देशासाठी गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या प्रत्येक सर्व सामान्य व्यक्तीचाही मोदीजींकडून गौरव केला जातो असे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले. यावेळी विदर्भातल्या अनेक बाबींचा त्यांनी उल्लेख करून विदर्भाचा सन्मान केला . जागतिक महिला दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा त्यांनी आवाहन करून मातृ शक्तीचे महत्त्व विशद केले.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या