पत्रकाराविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यास हायकोर्टाची स्थगिती
पातूर : प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत पातूर तालुक्यातील सुकळी ते पिंपळखुटा रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत ग्रामस्थ व खेट्रीचे सरपंच यांनी संबंधिताकडे केलेल्या तक्रारीवरून पत्रकार नासीर शेख , यांनी वृत्तपत्रामध्ये वृत्त प्रकाशित केले होते. तसेच अनेक वृत्तपत्रामध्ये वृत्त प्रकाशित झाले आहे.
ओबेरॉय कन्स्ट्रक्शनकडून दाखल केलेल्या याचिकेवर सरपंच व पत्रकार यांच्याविरुद्ध कलम 499 व 500,(IPC) तथा सार्वजनिक संपत्ती नुकसान अंतर्गत न्यायालयाच्या आदेशावरून चान्नी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.परंतु सदर न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत पत्रकार नासीर शेख यांनी नागपूर खंडपीठात ( FIR) रद्द करण्याची विनंती केली, सदर याचिकेवर न्यायालयाच्या आदेशाशिवाय आरोपपत्र ( चार्शिट) दाखल करण्यास स्थगिती दिल्याचे आदेश ८ फेब्रुवारी रोजी नागपूर खंडपीठाने काढले आहे. तसेच याबाबतचे नोटीस न्यायालयाने चान्नी पोलीस व ओबेरॉय कन्स्ट्रक्शन यांना काढले आहे. पत्रकार नासीर शेख यांच्यातर्फे एडवोकेट मोहम्मद अतीक इकबाल, व एन झेड मिर्झा यांनी बाजू मांडली.
0 टिप्पण्या