Ticker

6/recent/ticker-posts

हळदी कुंकूचा कार्यक्रम नव्या पिढीला प्रेरणा देणारा- सौभाग्यवती सुहासिनी ताई धोत्रे

हळदी कुंकूचा कार्यक्रम नव्या पिढीला प्रेरणा देणारा- सौभाग्यवती सुहासिनी ताई धोत्रे


अकोला- सातत्याने सर्वसामान्यांना सेवा आरोग्यसेवा सोबत मानवतेचे कार्य सामाजिक कार्य संसार करून दिशा देण्याचे काम करणाऱ्या मातृ शक्तीचा सन्मान करणे हे कर्तव्य असून त्यांच्यापासून नवीन पिढीला प्रेरणा व्हावी व त्यांच्या कार्याची दखल समाजाने घेऊन कार्य करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सौभाग्यवती सुहासिनी ताई धोत्रे यांनी केले. भारतीय जनता पार्टी महिला आघाडी व अष्टभुजा नवदुर्गा उत्सव मंडळ व भाजपा सखी सहेली ग्रुप तर्फे स्थानिक मराठा नगर येथे निकिता देशमुख दवारा आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. हळदी कुंकू कार्यक्रमात अष्टभुजा नवदुर्गा उत्सव मंडळ आणि बीजेपी सखी जर लक्ष सहेली ग्रुप तर्फे 40 वर्षा पासून सेवा देणाऱ्या डॉक्टर महिलांचा सत्कार आणि मार्गदर्शन.  दि  मराठा नगर येथे अष्टभुजा नवदुर्गा उत्सव मंडळातर्फे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी आरोग्य सेवेत 40 वर्षापासून सेवा देणाऱ्या जेव्हा कोणतीही अत्याधुनिक सुविधा नसताना आपली सेवा देणाऱ्या नामांकित डॉक्टर महिला वर्गाचा सत्कार करण्यात आला. 


सौ.सुहासिनी ताई धोत्रे, यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. जयश्री पिसे , डॉक्टर आशाताई देशमुख,डॉ. अलका ताम्हणे मॅडम,यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला.तसेच आता नवीन असलेल्याडॉ. यशश्री देशमुख यांचा पण सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सौ.. मंजुषाताई सावरकर, पुष्पा ताई खंडेलवाल, सौ. अर्चनाताई शर्मा,चंदा ताई शर्मा,सौ.सीमा ताई मांगते पाटील,सौ अंजली कवीश्वर,सौ अमरजा धूमे सौ.रश्मी अवचार,सौ जान्हवी डोंगरे,यांची लाभली.  हळदीकुंकाच्या या कार्यक्रमात डॉ अलका ताम्हणे मॅडम यांनी महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. चाळीस वर्षाच्या आधीची परिस्थिती आणि आधार आताच्या परिस्थिती डॉक्टर सेवेत झालेला बदल त्यांनी महिलांना सांगितला. महिलांनी आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी याची पण माहिती दिली. सौ सुहासिनी ते धोत्रे यांनी महिलांना आपल्या आरोग्याची काळजी घण्यास सांगितले आणि हळदी कुंकाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात विविध स्पर्धा आणि उखाण्यांची स्पर्धा सौ.ममता सारडा यांनी घेतल्या. सूत्रसंचालन माधुरी भगत यांनी केले. या कार्यक्रमासाठी सौ माधुरी नकासकर, सौ. अपर्णा कराळे सुरेखा कराळे वैशाली दिपके वैशाली डिवरे तारा थोरवे वर्षा निंभोरकर अर्चना चतारे,राणी घाटोळ, भारती चव्हाण, जयश्री चव्हाण ,ममता देशमुख दिव्या देशमुख मंदा देशमुख संगीता भुजबळ आरती पडोळे वैदही पाठक सुनिता गिरहे,सौ.पूनम निंभोर्कर, ऋचा शहायांनी मोलाचे सहकार्य केले. प्र. क्र 6 मधील मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजक आणि आभार प्रदर्शन सौ निकिता राहुल देशमुख यांनी केले होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या