Ticker

6/recent/ticker-posts

पिंजर पोलीस स्टेशन हद्दीत वाघा गड परिसरात आढळला महिलेचा मृतदेह

पिंजर पोलीस स्टेशन हद्दीत वाघा गड परिसरात आढळला महिलेचा मृतदेह

प्रतीनीधी- संतोष माने
बार्शीटाकळी:पिंजर पोलीस स्टेशन हद्दीतील महान धरणाजवळ वाघागड परिसरात एका अनोळखी महिलेचे प्रेत तरंगताना मिळून आल्याने आज सकाळी 27 जानेवारी रोजी एकच खळबळ उडाली.घटनेची माहिती मिळताच पिंजर पोलीस स्टेशनचे सपोनि राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनात तपास व पंचनामा केला असता, अनोळखी महिला अंदाजे 45 ते 50 वर्ष असून अंगात निळ्या रंगाची व लाल काठपदराची साडी निळ्या रंगाचे ब्लाउज हातात हिरव्या रंगाच्या प्लास्टिक बांगड्या गळ्यात पिवळ्या मण्याचे मंगलसूत्र पायाचे जोडवे नसलेली काळ्या रंगाची स्लीपर चप्पल सोबत शहाणे ज्वेलर्स मानोरा असे लिहिलेली पाऊस व काही पैसे अशा वर्णनाची महिला आपल्याकडे मिक्सिंग असल्यास पोलीस स्टेशन पिंजर जिल्हा अकोला येथे संपर्क करावा.असे सपोनि राहुल वाघ ठाणेदार पोलीस स्टेशन पिंजर 98 50 411 528 यांनी आव्हान केले आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या