शहरात विविध भागातून निघाला पोलिसांचा रूट मार्च
अकोला शहरात मुख्य मार्गावरून निघाला पोलिसांचा रूट मार्च.अयोध्या मध्ये श्रीराम मंदिराचे शुभारंभ होत असल्यामुळे देशभरात विविध कार्यक्रम पूजा अर्चना होत आहेत. त्या अनुषंगाने अकोला शहरांमध्ये ही विविध भागांमध्ये विविध कार्यक्रम राबविण्यात येत असून शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी त्यामुळे अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनामध्ये शहरातील संवेदनशील भागांमधून पोलिसांचा रूट मार्च करण्यात आला. यावेळी नागरिकांना शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या