Ticker

6/recent/ticker-posts

पालकमंत्री विखे पाटील यांनी घेतली दखल,  वैद्यकीय महाविद्यालयातील बेजबाबदारपणा चौकशीची मागणी 

पालकमंत्री विखे पाटील यांनी घेतली दखल, 
वैद्यकीय महाविद्यालयातील बेजबाबदारपणा चौकशीची मागणी 


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बेजबाबदार पणा व असंवेदनशील प्रकरणाची आयुक्ताच्या माध्यमाने चौकशी आमदार सावरकर यांची मागणीची पालकमंत्री नामदार विखे पाटील यांनी घेतली दखल पंधरा दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश आरोग्य सचिवास मार्फत सुद्धा चौकशी सुरू

अकोला

       सविस्तर वृत्त येथे पाहा....

अकोला जिल्हा अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत अधिनस्त असलेल्या सर्वोपचार रुग्णालयात प्रसुती रुग्णाच्या उपचारा दरम्यान झालेल्या हलगर्जीपणाची चौकशी करुन कारवाई बाबत आमदार रणधीर सावरकर यांनी आज नागपूर हिवाळी अधिवेशनात औचित्याच मुद्दा उपस्थित करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी ती तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मागणी केल्यावर त्यांनी तत्काळ दखल घेऊन या प्रकरणी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत चौकशी करून पंधरा दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे. सातत्याने अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात अकोला मेडिकल कॉलेज परिसरात अनेक प्रकार होत असून या संदर्भात नामदार गिरीश महाजन, नामदार हसन मुश्रीफ यांच्याकडे तक्रार करण्यात येत असून सर्वसामान्यांना त्रास होता कामा नये. अशी मागणी सभागृहात केली व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा या विषयावर लक्ष द्यावे व अकोला मेडिकल कॉलेजमधील गैरकारभारावर प्रतिबंध घालावा व सर्वसामान्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. 


हे प्रकरण जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मांडल्यावर त्यांनी तात्काळ चौकशीचे आदेश देऊन विभागीय आयुक्तांना पंधरा दिवसाच्या आत मध्ये अहवाल सादर करून दोषीवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले आहे तसेच मेडिकल कॉलेजमधील विविध पदांची भरती त्वरित करण्यात येऊन अकोला जिल्हा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी सभागृहात केली व येथील जिल्हा अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत अधिनस्त असलेल्या सर्वोपचार रुग्णालयात सौ. मोनिका निवृत्ती म्हसाळ ह्या दिनांक २/१२/२०२३ रोजी प्रसुती कारणास्तव भरती झाले आहे. त्यांची प्रसूती सिझेरियन होवून दिनांक ५/१२/२०२३ रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, तसेच त्यांना दि. १३/१२/२०२३ रोजी तपासणी करिता बोलवण्यात येऊन लगेज त्यांचे टाके काढण्यात आले. टाके काढताना सबंधिता डॉक्टरांनी अतिशय निष्काळजीपणा केल्यामुळे दि. १४/१२/२०२३ रोजी रात्री २.०० वाजता सिझेरियन केलेली जागा फाटली घरच्या मंडळींनी अतिशय घाबरलेल्या स्थितीत त्यांना पुनःश्च रुग्णालयात दाखल केले. 


रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची काळजी न घेता त्यांच्या सोबत अतिशय हलगर्जीपणा करण्यात आला त्यांना सोनोग्राफी कक्षात नेण्याकरिता स्ट्रेचर उपलब्ध करण्यात आले नाही. कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर व नर्सीग स्टाफद्वारे त्यांचा मानसिक आणि शारिरीक छळ करण्यात आला असून त्याबाबत सबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा आशयाची तक्रार सदर महिला रुग्णाचे भाऊ रवि मधूकर पाटील यांनी अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला यांच्याकडे करण्यात आलेली आहे त्याची दखल त्यांनी घेतली नाही व या संदर्भात प्रसार माध्यमांनी अनेक प्रश्न उपस्थित केल्यावर सुद्धा अकोला मेडिकल कॉलेज प्रशासन व डीन या संदर्भात लक्ष दिलं नाही. अकोला जिल्हा अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत अधिनस्त असलेल्या सर्वोपचार रुग्णालयात प्रसुती रुग्णाच्या उपचारा दरम्यान झालेल्या हलगर्जीपणाची चौकशी करुन कारवाई करण्यात यावी करिता विनंती आमदार सावरकर यांनी केली. यासंदर्भात आमदार सावरकर यांनी अकोला मेडिकल कॉलेज मधील गैर कारभाराचा सभागृहात वाचला व कारवाई करण्याची मागणी केली यासंदर्भात त्यांनी आज राज्याचे मंत्री गिरीश महाजन व हसनमुश्रीफ यांच्याकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे त्या संदर्भात चौकशीचे आदेश दिले आहे. आरोग्य सचिव तसेच अमरावती विभागीय आयुक्त सुद्धा या प्रकरणी चौकशी करून दोषींवर तसेच जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे सातत्याने सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे मेडिकल कॉलेज प्रशासन व अधिकारी लक्ष देत नाही त्यामुळे आज विधानसभेत आमदार सावरकर यांनी प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या