महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरीता, शहरात भव्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन !
कारंजा : कारंजा शहर तसेच तालुक्यातील तमाम आंबेडकरी अनुयायी तथा आंबेडकरवादी नागरिकांना नम्र निवेदन करण्यात येते की,महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनी निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक कारंजा येथे दि.६ डिसे.२०२३रोजी अभिवादन मोटारसायकल रॅलीचे आयोजन कारंजा शहरात करण्यात आले आहे.
करिता दि.६ डिसे.२०२३ रोजी सकाळी ९-०० वाजता वरील नियोजित ठिकाणी सर्वप्रथम महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यात येऊन सामूहिक आदरांजली वाहण्यात येईल.व नंतर कारंजा शहरातून प्रमुख मार्गाने सकाळी ९-३० ला मोटार सायकल रॅलीला प्रारंभ होईल.तरी सर्व आंबेडकरी अनुयायांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभिवादन मोटारसायकल रॅली समिती कारंजा यांचे तर्फे करण्यात येत आहे.
महादेवराव ठोंबरे, सचिन खांडेकर, किशोर उके, किशोर मानकर सर, शाम घोडेस्वार, शांम भाऊ घारू, योगेश खंडारे,रामेश्वर ढेंदुळे, मनोज सोनोने, रवींद्र बनसोड इत्यादी भिमकार्यकर्त्यांनी केले असल्याचे महादेवराव ठोंबरे यांनी कळवीले असून रॅलीमध्ये सहभागी होतांना सर्वांनी आपआपल्या दुचाकी मोटरसायकल वाहनाना पंचाशील ध्वज स्वतः लावून येण्यास सांगीतले आहे.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या