माउंट कारमेल इंटरनॅशनल स्कूल येथे नाताळनिमित्त रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन
अकोला स्थित प्रसिद्ध माउंट कार्मेल इंटरनॅशनल स्कूल येथे शनिवार दिनांक २३ डिसेंबर २०२३ रोजी रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कला-नृत्यद्वारे आपला नाताळचा आनंद व्यक्त केला. येशू ख्रिस्ताच्या जन्मावर आधारित एक लघु नाटिका सादर करण्यात आली. लहान मोठ्यांचा आवडता सांताक्लॉज ने सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना व शिक्षकांना शुभेच्छा व भेटवस्तू दिल्या.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मॅनेजर व प्रमुख धर्मगुरू फादर जोसलीन उपस्थित होते. त्याचप्रमाणे आमदार विप्लव बाजोरिया, फादर संजय व सौ. सीमा रोहातिया विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
ह्या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य फादर रुपेश यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका मेविस व हिताली यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या घरून समाजातील इतर गरजू व गरीब विद्यार्थ्यांसाठी खाऊ व जीवनोपयोगी वस्तू आणल्या होत्या. कार्यक्रम संपल्यानंतर ह्या सर्व वस्तू मलकापूर स्थित गायत्री बालिकाश्रम येथे जाऊन त्याचे वाटप करण्यात आले व नाताळचा आनंद त्यांच्यासोबत साजरा केला.
0 टिप्पण्या