सुमिरमा फाउंडेशन वर्धपन दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न
मराठी चित्रपट ख्वाडा, बबन, रौंदळ राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुपरस्टार भाऊसाहेब शिंदे सुमिरमा फाउंडेशनच्या वतीने आयोजित वर्धपन दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कलाकार, क्रीडा, उद्योग, समाजसेवा, अध्यापन, डॉक्टर अशा क्षेत्रातील व्यक्तींना प्रतिष्ठानतर्फे सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. यासोबतच निबंध लेखन स्पर्धेत प्रथम पाच क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह, रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला व सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.रमाकांत खेतान होते, अधिष्ठाता डॉ. पूजा खेतान यांनी फाउंडेशनची माहिती दिली.
सोबतच डॉ.अभयजी पाटील, राजेशजी मिश्रा, साजिद खान पठाणजी, डॉ.दीपकजी केळकर, लोकेश शर्मा, विशाल धांडे, पुजा काळे, अश्विनी परदेशी यांनी संबोधित केले.आभार आशिष खिल्लारे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुमिरामा फाउंडेशनच्या सर्व टीमने सहकार्य केले.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या