Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद दिव्यांग कर्मचारी खेळ क्रीडा स्पर्धांचे प्रथमच विभागीय स्तरावर आयोजन

जिल्हा परिषद दिव्यांग कर्मचारी खेळ क्रीडा स्पर्धांचे प्रथमच विभागीय स्तरावर आयोजन


अमरावती विभागातील सर्व जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कर्मचारी यांनी खेळ क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन खेळाचा आनंद घ्या-संजय बरडे (विभागीय अध्यक्ष) महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना यांचे आवाहन


अमरावती विभागातील, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा, अकोला ह्या सर्व जिल्हा परिषद मध्ये कर्मचारी खेळ क्रीडा स्पर्धा मध्ये यावर्षी प्रथमच महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे प्रयत्नाने सर्व जिल्हा परिषद मध्ये दिव्यांग कर्मचारी यांचेसाठी खेळ क्रीडा स्पर्धा होणार आहेत. त्या स्पर्धा विभाग स्तरावर सुद्धा होणार आहेत.त्यासाठी अमरावती विभागीय आयुक्त यांनी पत्र काढून सर्व जिल्हा परिषदांना निर्देश दिले आहेत. यासाठी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संजय बरडे, सचिव मो.अ.अजीज, कोषाध्यक्ष - दिलीप सरदार, अमरावती जिल्हा अध्यक्ष - दिलीप वसू, सचिव अभय मुळे, उपाध्यक्ष -सुधाकर दवंडे,गणेश महल्ले, रविंद्र देशमुख, वाशिम पदाधिकारी - रवि निराळे सह सर्व जिल्हा अध्यक्ष,सचिव, तथा पदाधिकारी यांनी प्रयत्न केले.आपापल्या जिल्हा परिषद मध्ये होऊ घातलेल्या खेळ क्रीडा स्पर्धेत स्वतः सहभागी व्हावे व इतर दिव्यांग कर्मचारी बंधू भगिनींना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.


दिव्यांग कर्मचारी यांचेसाठी खालीलप्रमाणे खेळ क्रीडा स्पर्धा राहतील
👉१) भालाफेक , गोळा फेक, थाळी फेक - महिला -पुरुष (अस्थिव्यंग/अंध १००%)
👉२) १०० मीटर धावणे, कॅरम, बुद्धीबळ. महिला-पुरुष.(अल्पदृष्टी, कर्णबधिर, मुकबधीर, अस्थिव्यंग व सर्व प्रकारचे दिव्यांग कर्मचारी)* यांनी आपल्या दिव्यांग प्रकारानुसार खेळ क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन संघटनेचे वतीने करण्यात येत आहे. कृपया आपल्या लोकप्रिय दैनिकांमध्ये प्रसिद्धी देण्यात यावी.👏♿


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या