Ticker

6/recent/ticker-posts

सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात इंग्रजी विभागातर्फे व्याख्यानाचे आयोजन  

सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात इंग्रजी विभागातर्फे व्याख्यानाचे आयोजन  



              दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी अकोला द्वारा संचालित सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात इंग्रजी विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. इंग्रजी संभाषण कौशल्य कसे विकसित करावे आणि स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्रजीचे महत्त्व या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन इंग्रजी विभागप्रमुख प्रा.डॉ.भारती पटनायक यांनी केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.मेघनाद भावे व प्रमुख प्रवक्ते म्हणून अंकुश मानकर तर प्रा.डॉ.ज्ञानशील खंडेराव यांची उपस्थिती लाभली.
            या कार्यक्रमात प्रमुख वक्ते अकुंश मानकर यांनी इंग्रजी भाषेतील संभाषण कौशल्य कसे विकसित करावे, स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्रजीचे महत्त्व, जीवनात इंग्रजी भाषेचे महत्त्व कसे आहे याविषयी मार्गदर्शन केले.तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.


            कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंग्रजी विभाग वर्गातील इतर प्राध्यापकांनी प्रा. ढोरे, प्रा. शुभांगी बारहाते प्रा.रेणुका सोमवंशी यांनी प्रयत्न केले तर विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाला प्रतिसाद दिला,
          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.मनिषा कांबळे यांनी केले तर प्रास्ताविक प्रा.श्रेया जोत यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. ऐश्वर्या कुलकर्णी यांनी केले आणि अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रमाची सांगता केली.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या