Ticker

6/recent/ticker-posts

अखेर सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांच्या मध्यस्थीने प्रविण तेलगोटे यांचे उपोषण मागे

अखेर सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांच्या मध्यस्थीने प्रविण तेलगोटे यांचे उपोषण मागे


अकोला प्रती- विभाग नियंत्रक कार्यालयात कार्यरत प्रवीण तेलगोटे वरिष्ठ लिपिक यांची कुणाचीही तक्रार नसतांना त्यांची नियमबाह्य विभाग भांडार शाखेत बदली करण्यात आली होती सदर बदली ही प्रवीण तेलगोटे मागासवर्गीय म्हणजेच बौद्ध समाजाचे असल्यामुळे करण्यात आली होती. असे प्रवीण तेलगोटे यांनी सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांना दिलेल्या तक्रारीत केली आहे. प्रवीण तेलगोटे वरिष्ठ लिपिक हे दिनांक 22 /8 /2023 पासून विभाग नियंत्रक राप अकोला कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेले होते. 02/09 /2023 रोजी त्यांची प्रकृती खालावली असल्यामुळे त्यांना सर्वोच्च रुग्णालयांमध्ये भरती करण्यात आले होते. प्रवीण तेलगोटे यांची प्रकृती खालावल्यानंतरही शुभांगी शिरसाट विभाग नियंत्रक राप अकोला यांनी त्यांना भेटून उपोषण मागे घेण्यासंदर्भात कुठलेही आश्वासन किंवा लेखी पत्र दिले नाही. म्हणून दिनांक 4.9 .2023 रोजी पासून प्रवीण तेलगोटे हे परत उपोषणास बसलेले होते. 


सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी फोन द्वारे विभाग नियंत्रक शुभांगी सिरसाट यांच्या सोबत चर्चा करून प्रवीण तेलगोटे यांची बदली तात्काळ रद्द करण्यात यावी.व त्यांना विभाग नियंत्रक याच इमारतीमध्ये दुसऱ्या टेबलवर नियुक्ती द्यावी. याबाबत विनंती केली परंतु शुभांगी शिरसाट हे प्रवीण तेलगोटे बौद्ध समाजाचे असल्यामुळे त्यांच्यावर जाणीवपूर्वक अत्याचार करत आहेत. प्रवीण तेलगोटे यांचे 22/ 8 /2023 पासून सुरू असलेल्या उपोषणामुळे प्रकृती खालवली असून त्यांची बदली तात्काळ रद्द करण्यात यावी. व शुभांगी शिरसाट विभाग नियंत्रक रा प अकोला हे कर्मचाऱ्यांचे जीवावर उठलेले अधिकारी असून त्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी.अन्यथा तीव्र आंदोलन छेडु .अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे यांनी मा.अजित कुंभार जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना पाठविलेल्या निवेदनात केली होती. उमेश सुरेशराव इंगळे यांच्या निवेदनाची तात्काळ दखल घेत प्रविण तेलगोटे यांची बदली रद्द करण्याचे आदेश विभाग नियंत्रक रा. प कार्यालयात धडकताच प्रविण तेलगोटे यांची बदली रद्द करण्यात आली असून प्रविण तेलगोटे यांनी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांचे आभार मानले


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या