Ticker

6/recent/ticker-posts

खरीप नुकसान भरपाई लागू करण्यासाठी अधिसूचना जारी करा- आ. सावरकर

खरीप नुकसान भरपाई लागू करण्यासाठी अधिसूचना जारी करा- आ. सावरकर 


अकोला
अकोला जिल्ह्यातील संपूर्ण ५२ महसूल  मंडळातील खरीपाच्या सोयाबीन पिकासाठी प्रतिकूल परीस्थीती नुकसान भरपाई लागू करण्यासाठी अधिसूचना जारी करून शेतकऱ्यांना विमा मोबदला द्या , अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी अकोला जिल्हाधिकारी यांना पत्रकार द्वारे केली आहे.


अकोला जिल्ह्यातील असंतुलित तसेच दीर्घकाळापासून खंडित झालेल्या पर्जन्यामुळे खरीप पिकाची परिस्थिती मोठ्या प्रमाणात धोक्यात आलेली आहे.खरीप हंगामातील सोयाबीन पिकाचा काढणी काळ सुरु होत आहे. जिल्ह्यातील सोयाबीन पिक ऐन फुल आणि शेंगा धरणीच्या काळात  पर्जन्याअभावी करपल्यामुळे सदरचे पिक उध्वस्त होण्याचे मागावर आहे.  जिल्ह्यातील एकूण ५२ महसूल मंडळातील  सदर पिक परिस्थिती सारखीच असतांना  HDFC ERGO GENERAL INSURANCE  या कृषी विमा कंपनीने मात्र फक्त ४५ महसूल मंडळातील सोयाबीन पिकाची परिस्थिती धोक्यात असून ७ महसूल मंडळात सोयाबीन पिक परिस्थिती चांगली असल्याचा चुकीचा निष्कर्ष काढला आहे. सबब, प्राप्त परिस्थिती  लक्षात घेता जिल्ह्यातील संपूर्ण ५२ महसूल  मंडळातील सोयाबीन पिकासाठी प्रतिकूल परिस्थिती  नुकसान भरपाई लागू  करून शेतकऱ्यांना देय होत असलेली विमा राशी तातडीने प्रदान करण्याची मागणी आ. रणधीर सावरकर यांनी जिल्हाधिकारी अकोला यांना केली आहे. 


जिल्ह्यात सोयाबीन पिकाची फुले व शेंगा धरणी अशी संवेदनशील अवस्था असतांना माहे ऑगस्ट मधील दीर्घकाळ पर्जन्य खंडित झाल्याने संपूर्ण पिक धोक्यात आलेले आहे. सोयाबीन पिकाच्या वेळापत्रकानुसार दिनांक २३ सप्टे २३ पासून काढणी हंगाम सुरु होतो. सदर  काढणी हंगामाच्या  १५ दिवसांपूर्वी पिक प्रतिकूल परिस्थिती नुकसान भरपाई अधिसूचना जारी  करणे आवश्यक ठरते. त्यानुसार दिनांक ९ सप्टे २३ पूर्वी अधिसूचना  जारी करणे क्रमप्राप्त असल्याने  प्राप्त परिस्थिती लक्षात घेता अकोला जिल्ह्यातील सरसकट सर्व ५२ महसूल मंडळातील  सोयाबीन पिकाकरीता खरीप हंगामातील  प्रतिकूल परिस्थिती (MID SEASON ADVERSITYनुकसान  भरपाई निश्चित करण्यासाठी तातडीने अधिसूचना जारी करणे बाबत  तातडीने कार्यवाही  करण्याची मागणी आ. रणधीर  सावरकर यांनी केली आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या