मुख्यमंत्री वैद्यकीय साहयता कक्षा कडुन उमेश इंगळे सन्मानित
अकोला प्रति - जकारिया फाउंडेशन अकोला व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष यांच्या वतीने अकोला, वाशिम, बुलढाणा आरोग्य परिसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच अकोला, वाशिम, बुलढाणा या तीन जिल्हातून रुग्णसेवक यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम चे आयोजित करण्यात आला होता. त्यामधून उमेश सुरेशराव इंगळे सामाजिक कार्यकर्ता तथा रुग्ण सेवक महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्ण सेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या सामाजिक तथा रूग्णसेवेच्या कामाची दखल घेत आदरणीय जावेद जी जकारिया सर, अध्यक्ष जकारिया फाउंडेशन अकोला यांनी कामाची दखल म्हणून वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मुंबई, मुख्यमंत्री वैद्यकीय साहयता कक्ष चे प्रमुख तथा विशेष कार्य अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय मा. मंगेश चिवटे साहेब यांच्या हस्ते उमेश सुरेशराव इंगळे यांचा शाल व सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती डॉ. अमोल रावनकर सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ, आ. राजू दादा भोर सहायता कक्ष प्रमुख अकोला,अलिमचंदाणी सर, विवेक पारसकर सर,मा.आमदार गोपीकिसन बाजोरिया साहेब, ईत्यादी मान्यवर व वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या