अकोला रेल्वे स्थानकात घुसलेल्या दहशतवाद्यांला जी आर पी व आर पी एफ पोलिसांनी पकडले
अकोला. दहशतवाद्यांनी अकोला रेल्वे स्थानक परिसर ताब्यात घेतला आहे. अशी माहिती रेल्वे पोलीस, जी आर पी पोलीसांना मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, जीआरपी पोलीस निरीक्षक अर्चना गाढवे, आरपीएफ निरीक्षक युनूस खान यांच्या नेतृत्वाखालील बॉम्ब पथक, दहशतवाद विरोधी पथकासह सर्व विभागांनी मिळून दहशतवादी कारवाया उद्ध्वस्त करण्यासाठी तुरंत रेल्वे स्टेशनवर पोहचून आतंकवाद्यांची आताची स्थिती बाबत माहिती घेऊन बंदोबस्त तैनात करून आतंकवाद्यांकडून सुरक्षा घेत मोठ्या चपळाईने संयुक्त कारवाई करत दहशतवाद्यांना पकडण्यात आले.
दहशतवाद्यांनी अकोला रेल्वे स्थानक परिसर ताब्यात घेतला आहे अशी माहिती पोलिस विभागांत पोहचताच पोलिसांचे सर्व विभाग अलर्ट मोड वर आले आणि क्षणाचाही विलंब न करता अकोला रेल्वे स्टेशनवरील आतंकवाद्यांना पकडण्यासाठी लगबग सुरु झाली. पोलिस अधिकारी स्वतः उपस्थीत राहून कोणते पोलिस अधिक दक्ष आहेत आणि कोणत्या पोलिसांनी चपळाई दाखवत आतंकवाद्यांला ताब्यात घेतलं यावर लक्ष ठेवले आजचा रेल्वे स्टेशन वरील आतंकवादी. पोलिसांनी ताब्यात घेतल्या नंतर पोलिस दलाकडून हे. प्रात्यक्षिक असल्याचे उघड झाल्यानंतर रेल्वे स्टेशन व परिसरातील प्रवाश्यानि आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आज अकोला पोलिसांनी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला कसे सामोरे जावे, पोलिस विभागाकडून उपाययोजना कशा करता येतील. नागरिकांच्या सुरक्षेसोबतच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये याचे प्रात्यक्षिक अकोला रेल्वे स्थानक परिसरात दाखवण्यात आले
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या