करोनाच्या संकट काळापासून पारस गावात बस सुरूच झाली नाही
शालेय विद्यार्थी व प्रवाशांचे हाल, प्रवाशांच्या आर्थिकतेला भुर्दंड
पारस हे गाव जवळ -पास ५० हजार लोकसंखेचे गाव आहे. ७ कि.मी. अंतरावर बाळापूर तालुका आहे. प्रवाशांना तहसील, पंचायत समिती ची व तालुक्याला मोठी बाजारपेठ असल्याने ये-जा करावे लागते. तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना शाळे साठी प्रवासी बस सारख्या सुलभ सोईस्कर कुठलेच वाहन नाही. आणि २५-३० कि.मी. अंतरावर अकोला जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे जिल्हा अधिकारी कार्यालय, जिल्हा सत्र न्यायालय, जिल्हा परिषद कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालय, रेल्वे स्टेशन लांबच्या प्रवासासाठी, तसेच मोठ्या प्रमाणात बाजार हाट हा अकोला जिल्ह्याच्या ठिकाणीच करावा लागतो. आॅफीसीयल - कार्यालयीन कामे, काॅलेजचे उच्च शिक्षण जिल्ह्याच्या ठिकाणीच सोई उपलब्ध आहेत. त्याकरिता पारस गावात ST बस सेवा ही लवकरात-लवकर सुरू झाली पाहिजे. करोना संकट काळाच्या आधी, पारसला बस सेवा सुरु होत्या. ते असे, बाळापूर ते बोरगाव वैराळे-मार्गे पारस, बाळापूर ते हाता-मार्गे पारस, आणि (हाल्टींग टाईम)-अकोला ते पारस असे ये-जा मिळुन ६ बसेस सुरू होत्या. पारस गावच्या आजु-बाजूस जवळ पास - २०/२५ लहान-सहान खेडी-गावे आहेत. म्हणजे ४०-५० हजाराच्या वर लोक संख्या असल्यामुळे ST बसच्या सुध्दा उत्पन्नात वाढ होउ शकते.ह्या सगळ्या कारणास्तव दि.२२/६/२३ रोजी बाळापूर ST डेपोत कंट्रोलर साहेब व दि. ४/७/२३ ला अकोला बस स्टॅंड, आगार क्र. २ डेपो मॅनेजर साहेब यांना *रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) बाळापूर तालुका व शहराच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष मान.दिपकभाऊ निकाळजे, राष्ट्रीय महासचिव डॉ.मोहनलाल पाटील, प्रदेश अध्यक्षा सुनिता ताई चव्हाण,प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या आदेशानुसार अकोला जिल्हा संपर्क प्रमुख तथा ठाणे जिल्हा महासचिव सचिनदादा कोकणे यांच्या मार्गदर्शनात अकोला जिल्हा अध्यक्ष अजय प्रभे , जिल्हा अध्यक्षा सिमाताई सरदार यांच्या नेतृत्वाखाली बाळापूर तालुका कार्याध्यक्ष, कमलकिशोर भरतीया यांनी, करोना संकट काळापासून पारस येथील बस सेवा बंद करण्यात आल्या होत्या, त्या लवकरात-लवकर, पुर्ववत सुरू करण्यात याव्यात यासाठी अकोला ST स्टॅण्ड आगार क्र.२ ला डेपो मॅनेजर साहेब यांना व बाळापूर ST बस डेपोत कंट्रोलर साहेब यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महिला आघाडी जिल्हा कार्याध्यक्षा, सरितादेवी मनोहर, खोपडे सर दिपा्लीताई अ. जाधव, सिमाताई उजागरे,अल्काताई सोनोने, यांच्या सह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या