Ticker

6/recent/ticker-posts

नगरपालिका निवडणुकीमध्ये यश प्राप्त करण्याच्या दिशेने महिला आघाडीची वाटचाल

नगरपालिका निवडणुकीमध्ये यश प्राप्त करण्याच्या दिशेने महिला आघाडीची वाटचाल


अकोला
संस्कृती, संवर्धनाचे धार्मिक तसेच राष्ट्रभक्ती एकता सामाजिक दायित्व सोबत देशाला सुजलाम सुफलाम शक्तिशाली राष्ट्र निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी मातृ शक्ती सदैव तत्पर असून 2014 पासून 51 टक्के मतं मातृशक्ती मिळून देत आहे यामध्ये वाढ करण्यासाठी लाभार्थी तसेच समाजातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे धार्मिक शैक्षणिक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या मातृ शक्तींना एकत्रित करण्याचे काम भाजपा महिला आघाडीने करून आगामी 2024 ला प्रचंड बहुमताने तसेच लोकसभा विधानसभा महानगरपालिका नगरपालिका निवडणुकीमध्ये यश प्राप्त करण्याच्या दिशेने महिला आघाडीने वाटचाल करावी अशी आव्हान भाजपा महिला आघाडीच्या नेत्या सौ.सुहासिनी ताई धोत्रे यांनी केले.


भाजपा कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नववर्षाच्या महाजन संपर्क अभियान संपर्क से समर्थन हा कार्यक्रम यशस्वी केल्यानंतर खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनात आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार वसंत खंडेलवाल आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकळे, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात भाजपा कार्यालयात सत्यनारायण कथा भजन कीर्तन डब्बा टिफिन पार्टी स्नेहभोजन कार्यक्रमात ते बोलत होत्या.
भाजपा महिला आघाडी अध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनात अकोला महानगर भाजपा महिला आघाडीने विविध कार्यक्रम 30 मे ते 30 जून पर्यंत पक्षाने दिलेले विविध कार्यक्रम यशस्वी केले. गुरु पूर्णिमा च्या पूर्वसंध्येला तसेच पंढरपूरला विठ्ठल रुक्माई सातत्याने एक महिना सेवा देतात आज एकादशी निमित्त त्यानिमित्त पंढरपूरला आयोजन करण्यात येते त्याच धरतीवर भाजपा महिला आघाडीने उपक्रम केला.
   या बैठकीत विविध विषयावर संघटनात्मक तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम तसेच राज्यातील पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच खासदार आमदार तसेच लोकप्रतिनिधींच्या कामकाजावर सकारात्मक प्रचार करून आगामी निवडणुकीमध्ये मातृ शक्तीने विविध माध्यमाने संपर्क करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. बैठकीत सर्वश्री
 

कमल सखी मंच अध्यक्षा सौ.सुहासिनीताई धोत्रे,सौ.मंजुषा ताई सावरकर, सौ अर्चनाताई मसने , सौ.अर्चना शर्मा* यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा कार्यालयात गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून श्री नागेंद्र पंचोली तथा सौ वंदना पंचोली सत्यनारायण पूजन व भजन करण्यात आले.
       यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
       भाजपा कार्यालयात टिफीन , आयोजन करण्यात आले होते.भाजपच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी सहभोजनचा आनंद लुटला.
यावेळी भाजपा कार्यालयात सहभोजनाचा आनंद कार्यक्रमात सौ सुमनताई गावंडे, सौ चंदाताई शर्मा, सौ संध्याताई लोहकपुरे,सौ. रश्मी कायंदे,श्रीमती संगीताताई नानोटे,सौ. वर्षा गावंडे,सौ.विठाबाई शिंदे,सौ.अनुराधा नावकार,सौ.मनीषा भन्साली,सौ. संगिता सुरंसे,सौ.राखी तीहिले,सौ.सोनाली समरितकर,सौ.जान्हवी डोंगरे,सौ सुषमा शुक्ला,सौ. मनिषा भुसारी,सौ प्रणिता समरितकर,सौ.वंदना पांचोली,सौ. प्रिया तीहीले,सौ.कल्पना गोटफोडे,सौ.निकिता देशमुख,सौ.साधना येवले,सौ रंजना विंचनकर, कु.वैष्णवी येवले आणि कु.जयश्री राऊत यांच्या सह हर्षल्होसात टिफीन बैठक पार पडली. राष्ट्रगीत आणि कार्यक्रम संपन्न झाले.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या