चान्नी पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड
सहा आरोपी अटक : ४० हजाराचा मुद्देमाल जप्त
प्रतीनीधी- नासीर शेख
पातूर : चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे होत असल्याच्या वारंवार राजकीय तक्रारी होत होत्या, परंतु चान्नी पोलीस स्टेशन मध्ये कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने ठाणेदार योगेश वाघमारे यांनी बाळापुर उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी बोलावून ठाणेदार योगेश वाघमारे, उपनिरीक्षक गणेश महाजन, जाधव सोनोने, हर्षल, आदींनी सापळा रचून सोमवार दि.८ मे रोजीच्या सायंकाळी सस्ती व नवेगाव या दोन गावात चार ठिकाणी जुगार अड्ड्यावर धाड टाकून सहा जणांना अटक करून त्यांच्याजवळून रोखसह जुगार साहित्य असा एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सस्ती येथील आरोपी बाळू दत्तूजी हिराळकर, उमेश रामभाऊ अंभोरे, मिलिंद गुलाब अंभोरे, व नवेगाव येथील सतीश भीमराव सरकटे, भगवान दिगंबर गाढवे, प्रशांत अश्रुजी पायघन, असे सहा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले
सस्ती व नवेगाव येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकल्याने अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले असून, पोलिसांचा पथक पाहून पळापळ झाली मात्र पोलिसांनी पाठलाग करून आरोपींना अटक केली
प्रतिक्रिया
सस्ती व नवेगाव येथे जुगार अड्डे सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच सापळा रचून धाड टाकली असता, सहा आरोपींना अटक करून त्यांच्या जवळून ४० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.या पुढेही अवैध धंदे करणाऱ्याविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. कोणाचीही गया केली जाणार नाही
योगेश वाघमारे ठाणेदार पोलीस स्टेशन चान्नी.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या